वडाळा ट्रक टर्मिनसवर कमर्शिअल हब

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

एमएमआरडीएकडून प्रस्ताव बनवण्याचे काम सुरू
मुंबई - वडाळा येथील ट्रक टर्मिनसच्या 60 हेक्‍टर जागेवर निवासी आणि कमर्शिअल हब स्थापन करण्याच्या हालचाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुन्हा सुरू केल्या आहेत. त्यानुसार प्राधिकरणाने प्रस्ताव बनवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वडाळा ट्रक टर्मिनसवर हब उभारण्याच्या कामाला वेग येणार आहे.

मोनो रेल, पूर्व मुक्त मार्ग अशा विविध पायाभूत प्रकल्पांमुळे वडाळा परिसर दळणवळणाच्या दृष्टीने सोईचा बनला आहे. वडाळा येथील ट्रक टर्मिनस बंद पडलेला असल्याने या जागेचा विकास करण्याचा निर्णय एमएमआरडीएने काही वर्षांपूर्वी घेतला. त्याप्रमाणे ट्रक टर्मिनसच्या 60 हेक्‍टर जागेवर निवासी आणि कमर्शिअल हब निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी प्राधिकरणाने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया राबवली होती; परंतु अनेक अडथळ्यांमुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला. अखेर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी प्राधिकरणाकडून प्रस्ताव तयार करण्यात येत असून, तो लवकरच पूर्ण होईल, असे एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.

Web Title: commercial hub on vadala track terminas