आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची 15 दिवसांपासून सुरू असलेली दुरुस्ती पूर्ण झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे वैमानिकाला विमान उतरवणे आणखी सोयीचे ठरणार आहे. 5 जूनपर्यंत ही दुरुस्ती चालणार होती; मात्र त्यापूर्वीच काम पूर्ण झाल्याने विमानसेवेचे कोलमडलेले वेळापत्रक शुक्रवारी रात्रीपर्यंत पूर्ववत होईल असे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरील इन्स्ट्रुमेंटल लॅण्डिंग यंत्रणेत सुधारणा करण्यात आली. या यंत्रणेनुसार धावपट्टीवर विमान उतरवताना वैमानिकाला तांत्रिक माहिती दिली जाते. मुख्य धावपट्टीवरील या यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी 17 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून दुरुस्तीचे काम सुरू होते. बुधवारी सायंकाळी ते पूर्ण झाले. दुरुस्तीच्या कामामुळे विमान धावपट्टीवर उतरवण्यास विलंब होत आहे. त्यामुळे विमानसेवेवर याचा परिणाम झाल्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणालाही तास-दीड तास उशीर होत होता. मुंबई विमानतळावरून दररोज 950 विमानांचे उड्डाण होते. तासाला सुमारे 45 विमानांची ये-जा सुरू असते. त्यामुळे धावपट्टीवर ताण पडतो. मुख्य धावपट्टीच्या यंत्रणेत सुधारणा केल्यामुळे वैमानिकाला विमान उतरवणे अधिक सुखकर होणार आहे. 

Web Title: Complete the runway repair of the international airport