‘मुखात शिवराय आणि हृदयात छिंदम’

‘मुखात शिवराय आणि हृदयात छिंदम’

मुंबई  - सामाजिक एकता, अखंडता धोक्‍यात आणणाऱ्या अर्थव्यवस्था, बेरोजगारी, कृषी, परराष्ट्र नीती, अंतर्गत सुरक्षा या सर्व आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेल्या भाजपचा स्थापना दिवस सोहळा म्हणजे नापास झालेल्यांनी आनंद साजरा करण्याचाच प्रकार आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपची जुमलेबाजी जनता आता स्वीकारणार नसल्याचे सांगून त्यांच्या मुखात शिवाजी महाराज आणि हृदयात छिंदम असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपला लगावला.

चव्हाण म्हणाले, की ‘‘राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मंत्रालयाला आत्महत्यालय करणारे शेकडो कोटींची उधळपट्टी करून स्थापना दिवसाचा उत्सव साजरा करीत आहेत. हा आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांच्या मरणाचा उत्सव का?’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com