राष्ट्रवादीला फटका... मलिकांची सुधारित याचिकाही फेटाळली!

Dawood Ibrahim Money Laundering Case Nawab Malik Custody Extend
Dawood Ibrahim Money Laundering Case Nawab Malik Custody Extend e sakal

आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान पार पडत आहे. यासाठी राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. भाजपने सहावा उमेदवार मैदानात उतरवल्याने चुरस वाढली आहे. यंदा अपक्षांच्या मतांवर दिल्लीचा रस्ता सुकर होणार असल्याने समीकरणं अवघड झाली आहेत.

दरम्यान, मतदानाची परवानगी देण्याची मागणी तुरुंगात असणाऱ्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला. सत्र न्यायालयाने याला नकार दिल्यानंतर देशमुख आणि मलिकांनी वरील न्यायालयात धाव घेतली. मात्र विशेष न्यायालयानेही त्यांना दणका दिला. त्यामुळे महाविकास आघाडीची दोन मतं कमी होणार हे स्पष्ट होतं. यानंतर दोन्ही मंत्र्यांच्या वकिलांनी पुन्हा याचिका दाखल केली. ईडीकडून अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. (Anil Deshmukh Nawab Malik Voting For Rajya Sabha)

अनिल देसाई यांनी मलिक यांची बाजू मांडली. यासाठी त्यांनी तात्पुरत्या जामिनाची मागणी केली आहे. मात्र अटक असताना जामीन कोणत्या आधारावर द्यायचा, असा प्रश्न कोर्टाने विचारला. यावर प्रत्युत्तर देताना पोलीस बंदोबस्तात मतदान करू देण्याची मागणी करण्यात आली. मात्र आता मलिकांना सुधारित याचिकेबाबतही फटका बसला आहे.

सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर मलिक यानी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई सत्र न्यायालयाने मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी परवानगी मिळण्याची याचिका फेटाळली होती. अमित देसाई हे मलिक यांना तात्पुरता जामीन किंवा पोलीस बंदोबस्तात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी परवानगी मागत होते. मात्र, न्यायालयाने नकार दिला. तसेच सुधारित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. अद्याप कोर्टाने यावर सुनावणी घेतलेली नाही. चार वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याने मलिक यांचं मतदान होणं आता अशक्य झालं आहे.

न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी यापूर्वीच अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सध्या सुनावणी फक्त नवाब मलिक यांच्या बाबतीत सुरू होती. अखेर त्यांना न्यायालयाने दणका दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com