प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेऊन संपवले आयुष्य

Suicide Hanging
Suicide Hanging

बोर्डी (पालघर) : डहाणू तालुक्यातील वाणगाव पुर्वेकडील जंगल भागात झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरूण तरूणीचा मृतदेह आढळ्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हनुमान नगर येथील जितेश डावरे हा मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास आपल्या मित्राची बाईक घेऊन घराबाहेर पडला होता. जितेश हा विवाहित असून बोईसर गणेशनगर येथील आम्रपाली गवई या विवाहित मुली सोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांना सदर मुलासोबत असलेल्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती असल्याने मुलीच्या घरचे हे मयत जितेशच्या घरी बुधवारी रात्री येऊन तपास करून गेले होते. मात्र, गुरुवारी सकाळी गावकऱ्यांना दोघांचे मृतदेह झाडावर लटकलेल्या स्थितीत आढळले आहेत.

तारापुर औद्योगिक वसाहतीत एक कंपनीत जितेश डावरे हा सुमारे ६ वर्षांपासून काम करत होता. २० दिवसापूर्वी आम्रपाली गवई ही देखील त्याच कंपनीत कामाला लागली होती. ओळखीतुन त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघे देखील विवाहित असुन विवाहबाह्य संबंध सदर मुलीच्या घरच्यांना माहिती झाले होते.

मंगळवारी सकाळ पासुन बेपत्ता असलेल्या दोघांना मुलीच्या घरचे देखील शोधत होते. आत्महत्या झालेल्या घटनास्थळी जितेश याने मित्राची आणलेली बाईक दुरवर एक स्टँड वर उभी असलेल्या अवस्थेत होती व त्यावर सदर मुलीचे चप्पल देखील असल्याचे दिसते. गळफास घेतला ते झाड खुप उंच असुन पावसाने झाडावर चढणे घसरण होऊ शकते अशा स्थितीत झाडावर चढून आत्महत्या करणे कठीण असल्याचा पोलिसांना संशय आहे.

घटनास्थळी असलेली बाईक ही सुमारे ३ मिटर अंतरावर असुन झाडाचा फांदा व दोरी याचे सुमारे २ मिटर अंतर आहे. मुळात जर झाडाला दोरी बांधुन नंतर जर बाईक वरून उडी घेतली असती तर बाईक देखील खाली पडलेल्या अवस्थेत असती. तसेच तेवढी दोरी देखील मोठी नव्हती. त्यातच पाऊस चालु असताना देखील झाडावर चडताना कपड्यांना कुठेही मातीचे डाग दिसत नसुन मुलीच्या तोंडातुन रक्त बाहेर येत असल्याचे दिसत होते. विवाहबाह्य प्रेमप्रकरणातून झालेली ही आत्महत्या व घटनस्थळाचे चित्र यावरून संशय निर्माण होत आहे. वाणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळाचा पंचनामा व अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com