मुलुंडमध्ये प्रेमीयुगुलाची विष घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

मुंबई - कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाहाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुलुंड येथे बुधवारी सकाळी उघडकीस आला. सलमान खान आणि मनीषा नेगी (वय 23) अशी मृतांची नावे आहेत. मुलुंड न्यायालयाच्या आवाराबाहेर उभ्या असलेल्या गाडीत दोघांनी विष घेऊन जीवन संपवले. मुलुंड पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मनीषा नेगी ही तरुणी मुलुंड परिसरात राहत होती. तिचे सलमान खान याच्याशी प्रेम होते. दोघेही लग्न करणार होते; मात्र सलमान हा मुस्लिम असल्याने मनीषा हिच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. त्यावरून मनीषा हिचे मंगळवारी रात्री घरच्यांशी कडक्‍याचे भांडणही झाले होते. या भांडणानंतर दोघांनी मंगळवारी मध्यरात्री हे पाऊल उचलल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पहाटे घटनास्थळी धाव घेतली. न्यायालयाच्या आवाराबाहेरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीतून दोघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी अग्रवाल रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत, अशी माहिती झोन- 7 चे पोलिस उपायुक्त अखिलेश सिंग यांनी दिली. 

Web Title: couple Suicide by poisoning in mulund