झाडे तोडण्यावरील बंदी न्यायालयाने उठवली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

मुंबई - कुलाबा-सीप्झ मेट्रो-3 प्रकल्पात येणारी झाडे तोडण्यास दोन महिन्यांपूर्वी दिलेली अंतरिम स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 5) उठवली. त्यामुळे मेट्रो-3च्या कामाला पुन्हा सुरवात होऊ शकते. 

स्थगिती उठवताना, पर्यावरण आणि विकास यात समतोल असायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाने (एमएमआरसीएल) आतापर्यंत या प्रकल्पात येणाऱ्या सुमारे पाच हजार झाडांची कत्तल केली. त्याविरोधात स्थानिक नागरिकांनी केलेल्या जनहित याचिकेवर आज मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने निकाल दिला. तोडलेल्या झाडांचे पुनर्रोपण करण्याचे हमीपत्र "एमएमआरसीएल'ने एका आठवड्यात न्यायालयात सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यांची पूर्तता होतेय की नाही, याची पाहणी करण्यासाठी एका समितीची नियुक्तीही न्यायालयाने केली आहे. महाराष्ट्र विधी सहायता केंद्राचे सचिव आणि उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार यांचा या समितीमध्ये समावेश आहे. सुमारे 33 किलोमीटर मार्गावरील झाडे तोडण्यात आली आहेत.