डॉ. तात्याराव लहाने यांना न्यायालयाची नोटीस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

मुंबई - पदाचा गैरवापर करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना "व्हीआयपी ट्रीटमेंट' दिल्याप्रकरणी जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी डॉ. लहाने यांना चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

याप्रकरणी विशेष अंमलबजावणी (ईडी) सत्र न्यायालयाने डॉ. लहाने यांना दोषी ठरवले आहे; मात्र त्यांच्यावर कोणती कारवाई करावी, याचा निर्णय उच्च न्यायालय निर्णय घेईल, असे त्या न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानुसार उच्च न्यायालयात ही सुनावणी झाली. शस्त्रक्रिया करण्याच्या निमित्ताने भुजबळ यांना आर्थर रोड कारागृहातून जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. शस्त्रक्रियेपूर्वीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे भुजबळ यांनी 35 हून अधिक दिवस मुक्काम केला होता. डॉ. लहाने यांच्या मदतीनेच भुजबळ यांनी हा मुक्काम ठोकल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉ. लहाने यांच्यावर कारवाईची मागणी करणारा अर्ज विशेष न्यायालयात दाखल केला होता.