धड्याच्या लेखिकेवर कारवाईची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

मुंबई - आयसीएसई बोर्डाच्या चौथीच्या पुस्तकात, "कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड कसे झाले, तर गड जिंकणाऱ्या तानाजी मालुसरे यांचे नाव टोपण नाव "सिंह' होते', असा उल्लेख असल्याने लेखिका मंजूषा स्वामी आणि प्रकाशकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी वसईतील मराठा समाजाने सोमवारी (ता.22) मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा अभ्यास न करता पाठ्यपुस्तकात चुकीचा उल्लेख करणे म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना चुकीचा इतिहास शिकवण्यासारखे आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून चौथीच्या या वादग्रस्त पुस्तकावर बंदी आणावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली. दरम्यान, विरार येथील नॅशनल इंग्लिश स्कूलने आपल्या पातळीवर त्या धड्यातील चूक दुरुस्त केली आहे.