मुंब्रा येथे पकडलेल्या तरुणाला सौदीतही झाली होती अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

मुंबई - मुंब्रा येथून अटक करण्यात आलेल्या "इसिस'शी संबंधित नाझीम या तरुणाला सौदी अरेबियातही अटक झाली होती, अशी माहिती त्याच्या चौकशीत समजली आहे. तिथे 18 दिवस कैदेत राहिल्यानंतर त्याला भारतात पाठवण्यात आले होते.

नाझीम ऊर्फ उमर शमशाद शाह याने दोन वर्षे सौदी अरेबियात प्लंबर म्हणून काम केले होते. त्यानंतर 2015 मध्ये तो मक्का हबीब येथे गेला. तिथे तो दीड वर्षे कामाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा काम बदलले. वर्षभरानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली होती. 18 दिवसांची शिक्षा भोगल्यानंतर त्याला भारतात परत पाठवण्यात आले.

तो दहशतवादी विचारांपासून प्रभावित झाला होता. त्यानंतर त्याने फेसबुकवरून संबंधित चित्रफिती पाहण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो दहशतवाद्यांशी चॅटिंग करू लागला. चार महिन्यांपूर्वी तो कामासाठी मुंब्रा येथे आला होता. त्याला घातपात घडवून आणायचा होता. त्याच्या साथीदारांचा एटीएस शोध घेत आहे.