प्रेमप्रकरणातून महिलेला पेटवले; प्रियकरही होरपळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

उल्हासनगर - प्रेमप्रकरणातून महिलेला पेटवल्याची घटना मंगळवारी उल्हासनगरमध्ये घडली. तिला पेटवणारा प्रियकरही होरपळला आहे. या घटनेमुळे 25 वर्षांपूर्वी शहरात घडलेल्या रिंकू पाटील हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या. दोन दिवसांत दोघांना पेटवल्याच्या घटना घडल्यामुळे उल्हासनगर हादरले आहे.

उल्हासनगर कॅम्प दोनमधील मोना मार्केट या कापडाच्या बाजारातून दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास धूर येऊ लागला. काही जणांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पार्वती शिवप्पा मेहेत्रे (30) या महिलेचा जळून मृत्यू झाल्याचे दिसले. पार्वती ही अंबरनाथ पश्‍चिम येथील चिंचपाडा परिसरात राहत होती. घटनास्थळावरून नरसिमन हनुमंता तलारी (49) हा जळालेल्या अवस्थेत रिक्षाने पळून गेला. नरसिमन हा मध्यवर्ती रुग्णालयात नंतर उपचारासाठी दाखल झाला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पार्वती व नरसिमन यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. याबाबतची तक्रार पाच वर्षांपूर्वी नरसिमनची पत्नी इरम्माने अंबरनाथ पोलिस ठाण्यात केली होती.

Web Title: crime in ulhasnagar