हत्या, खंडणीप्रकरणी सराईत गुंडाला अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - उत्तर प्रदेशातील गुंड सुभाषसिंग ठाकूर आणि परदेशातील गुंड विजय शेट्टी यांच्या टोळीशी संबंधित सराईत गुंडाला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. अरपुतराज विरास्वामी जॉन असे त्याचे नाव असून, त्याच्यावर मानपाडा आणि नालासोपाऱ्यातील दोन हत्यांचा संशय आहे. यापूर्वी ठाणे व दिल्लीतही त्याच्यावर हत्या व खंडणीचे गुन्हे दाखल होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जॉन दहिसरचा रहिवासी आहे. तो कांदरपाडा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी त्याला अटक केली. त्याच्याकडे सहा मोबाईल, आठ सिम कार्ड, राष्ट्रवादी रेल विकास संघटन, राष्ट्रवादी मानवाधिकार आंदोलन पदाधिकारी असल्याचे ओळखपत्र सापडले. त्याच्याविरुद्ध 1999 मध्ये दिल्लीतील सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात खंडणीचा, एआयडीसी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होता. त्यात जामीन मिळाल्यापासून तो बेपत्ता होता. 

Web Title: criminal arrested