पीकविमा योजनेसाठी २४ जुलैपूर्वी अर्ज करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

मुंबई - राज्यात खरीप २०१८ हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी २४ जुलैपूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे केले. 

मुंबई - राज्यात खरीप २०१८ हंगामात प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी २४ जुलैपूर्वी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे केले. 

ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येणार आहे. महसूल मंडळ, महसूल मंडळ गट, तालुका या स्तरांवर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३४ जिल्ह्यांसाठी विमा कंपन्या नियुक्त करण्यात आल्या असून यवतमाळ, औरंगाबाद, धुळे, गोंदिया, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी, बीड, सांगली, नाशिक, रायगड या जिल्ह्यांकरिता ओरिएन्टल इन्शुरन्स, जालना, वाशीम, नागपूर, गडचिरोली, पालघर यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स, नांदेड, हिंगोली, वर्धा, ठाणेसाठी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स, उस्मानाबाद, जळगाव, सोलापूर, सातारा यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स, परभणी, अमरावती, भंडारा, पुणे यासाठी इफको टोकियो इन्शुरन्स आणि अकोला, बुलडाणा, चंद्रपूर, नंदुरबार याकरिता आयसीआयसीआय लोम्बार्ड नियुक्त करण्यात आली आहे.

Web Title: crop insurance scheme form pandurang phundkar