'यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी'

'यश मिळवण्यासाठी प्रयत्नांची कास धरावी'

मुंबई - तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रगतीमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येत आहे. जगामध्ये सर्वोत्तम काही नाही. तुम्ही स्वत:ला झोकून दिले, तर छोट्या बाबीतूनही खूप मोठी गोष्ट निर्माण होऊ शकते. मात्र, त्यासाठी प्रयत्नांची कास धरायला हवी, असा महत्त्वाचा संदेश सद्‌गुरूंनी तरुणांना दिला.

तरुण आणि सत्य या विषयाला वाहिलेल्या सत्रांमध्ये त्यांनी हजारो तरुण मुंबईकरांसमोर खासगी, सामाजिक, राजकीय यांसह व्यावसायिक समस्याची उकल केली. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्‍नॉलॉजी, (आयआयटी) मुंबई, जे. जे. स्कूल ऑफ आर्ट व सोफिया या महिला महाविद्यालयामध्ये २०, २१ व २२ सप्टेंबरला सद्‌गुरुंचे व्याख्यान झाले होते. जेजे स्कूलमधील दोन तासांच्या व्याख्यानात सद्‌गुरूंनी वास्तुशास्त्र, वायुगती शास्त्र, उत्साह व स्थिरता, क्रोध, असुरक्षितता, नाही कसे म्हणावे यासह अनेक विषयांवर तरुणांशी संवाद साधला. या वेळी सद्‌गुरूंनी युरोपियन कलांमध्ये कोणताही आनंद नाही. उलट भारतीय कलेमुळे अनेक मंदिरांची निर्मिती झाल्याचे सांगितले.

सोफिया महाविद्यालयातील तरुणींनी अनेकांसोबत शारीरिक संबंध, स्पर्धेच्या जगात प्रेरणा कोणाकडून घ्यावी यांसह अनेक प्रश्‍न उपस्थित केले. दुसऱ्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न केला, तर हे एक आजारपण आहे हे लक्षात घ्या, असे सद्‌गुरूंनी या वेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com