सीमाशुल्कच्या 10 कोटींवर डल्ला

Money
Money

मुंबई - करपरतावा म्हणून सीमाशुल्क विभागाने निर्यातदारांची राखून ठेवलेली १० कोटींची रक्कम संगणक यंत्रणेमध्ये बदल करून ती बनावट बॅंक खात्यांवर वळवणाऱ्या तिघांना महसूल गुप्त वार्ता विभागाने काल अटक केली. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा यूजर आयडी वापरून या टोळीने रकमेवर डल्ला मारल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात अधिकारीही अडकण्याची शक्‍यता आहे. 

करपरतावा देण्याची आवश्‍यकता नसलेल्या कंपन्यांची सीमाशुल्क विभागाच्या सॉप्टवेअरमध्ये वेगळी नोंद असते. रकमेवर डल्ला मारणाऱ्या या टोळीने अधिकाऱ्यांच्या मदतीने या नोंदीतून कंपन्यांची नावे काढून टाकली. त्यानंतर त्यांच्या परताव्याची रक्कम स्वतःच्या बनावट बॅंक खात्यांवर वळती केली.

याप्रकरणी महसूल गुप्त वार्ता विभागाने सदरूद्दीन लस्सनवाला (३८), मोहम्मद इस्माईल शेख (४०) व रमेश सुरेशबक्ष सिंग (५२) यांना अटक केली आहे.

अशी आखली योजना
आरोपी अर्जुन गोरेगावकरने परताव्याची रक्कम अडकलेल्या निर्यातदारांची माहिती मिळवली. सीमाशुल्क विभागाच्या संगणक यंत्रणेत निर्यातदारांच्या आयात- निर्यात कोड (आयईसी), शिपिंग बिलांच्या नोंदी होत्या.

गोरेगावकरने ही माहिती लस्सनवाला व सिंग यांना दिली. या दोघांच्या सांगण्यावरून शेखने सर्व निर्यातदार कंपन्यांचा आयईसी क्रमांक तसेच ठेवून या कंपन्यांच्या नावाने बनावट खाती उघडली. त्यानंतर या टोळक्‍याने अधिकृत खात्यात बदल करण्यासाठी अर्ज केला. ईडीआय यंत्रणेत संबंधित निर्यांतदारांचे खाते बदलले. तसेच, परतावा थांबवण्यासाठी यंत्रणेतील अलर्टही काढून टाकला. त्यानंतर थांबवण्यात आलेली रक्कम या बनावट खात्यावर वळवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com