कंपनी मालकाला 30 लाखांचा गंडा 

कंपनी मालकाला 30 लाखांचा गंडा 

मुंबई - मोबाईल व डी2एच रिचार्ज करणाऱ्या ऍप्लिकेशनमधील त्रुटींचा फायदा उचलून कंपनी मालकाला 30 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दोघांना सायबर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. महेशभाई जाधव (28) व महेश सोलंकी (30) अशी त्यांची नावे असून ते भावनगर-गुजरात येथील रहिवासी आहेत. त्यांनी 20 हजार बेकायदा व्यवहार करून 30 लाखांची रक्कम काढल्याचे उघडकीस आले आहे. दोन्ही आरोपींना मंगळवारी अटक करून मुंबईत आणण्यात आले आहे. 

अंधेरीत कार्यालय असलेली तक्रारदार कंपनी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाईल व डी2एच रिचार्ज सेवा पुरवते. कंपनी, वितरक व किरकोळ व्यापाऱ्यांसह थेट ग्राहकांना ही सेवा पुरवली जाते. व्यापाऱ्यामार्फत या सेवेचा वापर केल्यास कंपनीला कमिशन वगळून रक्कम मिळते, तर दुसऱ्या सुविधेत ग्राहक स्वतःचे खाते तयार करून ई-वॉलेटच्या माध्यमातून रक्कम देतो. थेट ग्राहक सुविधा अजूनही प्राथमिक टप्प्यात असल्यामुळे त्यात काही त्रुटी आढळल्या होत्या. आरोपींनी या दोन्ही सुविधांमध्ये खाते उघडले होते. त्या माध्यमातून आरोपींनी 20 हजार व्यवहार करून कंपनीची 30 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीने 14 सप्टेंबरला सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. आयपी ऍड्रेसच्या माध्यमातून सायबर पोलिस भावनगरमधील दोन आरोपींपर्यंत पोहोचले. चौकशीत आरोपींनी जुगार व घर दुरुस्तीसाठी फसवणुकीची रक्कम वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी आणखी कुठल्या कंपनीची फसवणूक केली का? याचा तपास सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com