तूरडाळ मुंबईकरांच्या आवाक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑगस्ट 2016

मुंबई - गेले दीड वर्ष तूरडाळीने किमतीचा उच्चांक गाठून सर्वसामान्यांच्या ताटातून ती गायब झाल्यानंतरही किंमत आटोक्‍यात ठेवण्यात अपयश आलेल्या राज्य सरकारने डाळ आटोक्‍यात ठेवण्यासाठी आता कुठे प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईमध्ये काही निवडक विक्री केंद्रे आणि काही मॉलमधून 95 रुपयांना तूरडाळ विक्री सुरू केली असल्याने ग्राहकांना तेवढाच दिलासा मिळणार आहे. 

मुंबई - गेले दीड वर्ष तूरडाळीने किमतीचा उच्चांक गाठून सर्वसामान्यांच्या ताटातून ती गायब झाल्यानंतरही किंमत आटोक्‍यात ठेवण्यात अपयश आलेल्या राज्य सरकारने डाळ आटोक्‍यात ठेवण्यासाठी आता कुठे प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईमध्ये काही निवडक विक्री केंद्रे आणि काही मॉलमधून 95 रुपयांना तूरडाळ विक्री सुरू केली असल्याने ग्राहकांना तेवढाच दिलासा मिळणार आहे. 

केंद्र सरकारकडून राज्य शासनाला प्राप्त झालेली तूरडाळ खुल्या बाजारात येण्यास सुरवात झाली असून मुंबईमध्ये विविध मॉल, अपना बाजार आदी ठिकाणी आजपर्यंत सुमारे 48 टन तूरडाळ विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. ही तूरडाळ 95 रुपये किलो दराने विकण्यात मुंबईत सुरवात झाली असून राज्यातही अनेक ठिकाणी ही तूरडाळ उपलब्ध झाली आहे. तसेच आणखी मोठ्या प्रमाणात स्वस्त तूरडाळ उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिली. 

केंद्राकडून आतापर्यंत सुमारे साडेसातशे टन तूरडाळ राज्य शासनाला मिळाली आहे. यातील आजपर्यंत सुमारे 48 टन तूरडाळ मुंबईत पोचली आहे. अपना बाजार (8 टन), एम. बी. मार्ट (8 टन), बिग बझार (17 टन), हायपरसिटी (3 टन), डी मार्ट (5 टन), ग्रोमा (10 टन), मजदूर संघ (1 टन), मालाडमधील एम. बी. मार्ट (2 टन), दिंडोशीतील शाहू ग्रेन (0.5 टन), तसेच रिलायन्स रिटेल (10 टन) आदी ठिकाणांमध्ये ही तूरडाळ 95 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध झाली असून त्याची विक्रीही सुरू झाली आहे. या मॉल, तसेच रिटेल शॉपमध्ये शासनाने ठरविलेल्या दरात तूरडाळ विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे फलकही लावण्यात आले आहेत. याशिवाय विविध जिल्ह्यांमध्ये स्वस्त धान्य दुकानांमधूनही स्वस्त दरातील तूरडाळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पाठक यांनी दिली आहे. 

अन्यत्रही विक्री सुरू 

मुंबईमध्ये कुलाबा सेंट्रल को ऑपरेटिव्ह कंझ्यु. होलसेल अँड रिटेल स्टोअर्सच्या बांद्रा, विलेपार्ले येथील दुकानांमध्ये, सांताक्रूझमधील रिलायन्स रिटेल लि., अपना बाजारच्या विलेपार्ले, अंधेरी येथील दुकानांमध्ये तसेच विलेपार्ले येथील मुंबई ग्राहक पंचायतीमध्ये, बिग बाजाराच्या अंधेरी व विलेपार्लेतील मॉलमध्ये, अंधेरीतील डी मार्टमध्ये, बांद्रा येथील मुंबई सबबर्न शॉपकीपर वेल्फेअर असोसिएशन, जोगेश्वरीतील नंदादीप कझ्युमर को. ऑप. सोसायटी आणि अंधेरीतील मुंबई ग्रेन डीलर्स असोसिएशन या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीने स्वस्त तूरडाळ विक्री करण्यात आली आहे.