दाऊदच्या मालमत्तांचा नऊ ऑगस्टला लिलाव

Dawood-Ibrahim
Dawood-Ibrahim

महाराष्ट्र, गुजरातेतील नऊ ठिकाणांचा समावेश
मुंबई - मुंबईतील 1993 च्या बॉंबस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या महाराष्ट्र आणि गुजरातमधील नऊ मालमत्तांचा लिलाव नऊ ऑगस्टला होणार आहे. यातून दोन ते तीन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून बोली मागवल्या आहेत. यात मुंबई, औरंगाबाद, वलसाड, दमण, सुरत आणि अहमदाबाद येथील नऊ मालमत्तांचा समावेश आहे. "स्मगलिंग ऍण्ड फॉरेन एक्‍स्चेंज मॅनिपुलेटर्स' (फॉरफीचर ऑफ प्रॉपर्टी) कायद्यांतर्गत ही प्रक्रिया होत आहे.

मुंबईतील वाय. बी. चव्हाण सभागृहात नऊ ऑगस्टला सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत हा लिलाव होईल. इच्छुक खरेदीदार 24 जुलैपर्यंत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मालमत्ता पाहू शकतात. अनामत रक्कम जमा करण्याची मुदत सहा ऑगस्टपर्यंत आहे. गेल्यावर्षीही दाऊदच्या तीन मालमत्तांचा लिलाव झाला होता, त्या सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टने 11.50 कोटींत खरेदी केल्या होत्या. लिलावात शबनम गेस्ट हाउस, दामरवाला बिल्डिंग आणि हॉटेल रौनक अफरोज यांनीही सहभाग घेतला होता. यंदाही सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्ट खरेदीदारांमध्ये पहिल्या क्रमांकावर असेल, असे सूत्रांनी सांगितले.

मुंबईतील लिलाव
- पाकमोडिया स्ट्रीटवरील मासूला (अमिना) बिल्डिंगचा समावेश.
- 79.43 लाख राखीव मूल्य.
- 25 लाख रुपये अनामत रक्कम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com