मुरबाड जंगलात मृतदेह आढळला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

सरळगाव - पुण्यातील एका व्यक्तीचा मृतदेह मुरबाडमधील न्याहाडीच्या जंगलात आढळला. रविवारी हा प्रकार उघडकीस आला.

सरळगाव - पुण्यातील एका व्यक्तीचा मृतदेह मुरबाडमधील न्याहाडीच्या जंगलात आढळला. रविवारी हा प्रकार उघडकीस आला.

माळशेज महामार्गाजवळ न्याहाडी गावाच्या जंगलात अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. पोलिस तपासात त्याचे नाव नीलेश पोपटराव भुजबळ असून, तो पुण्यातील तळेगाव येथील रहिवासी असल्याचे समजले. साधारणतः मृतदेह आठ दिवस येथे पडून असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: deathbody receive in murbad forest