मुलुंडमध्ये हरीण मृतावस्थेत आढळले

समीर सुर्वे
शनिवार, 13 मे 2017

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतावस्थेत आढळलेले हरीण कळपातून वेगळे झाले होते. त्या हरीणाच्या मागे माकडांचा कळप लागल्याने ते खड्डयात पडले. याच कारणामुळे त्या हरीणाचा मृत्यू झाला.

मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आज (शनिवार) सकाळी हरीण मृतावस्थेत आढळले. या हरीणाच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्यात येत आहे.

भांडुप येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हरीण जखमी अवस्थेत सापडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली. त्यानंतर पावस-मुंबई येथील वन विभागाचे कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. मात्र, हरीणाचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी उद्यानातील बचाव पथकही त्याठिकाणी पोहचले होते. हरीणाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याला पथकाकडून नेण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतावस्थेत आढळलेले हरीण कळपातून वेगळे झाले होते. त्या हरीणाच्या मागे माकडांचा कळप लागल्याने ते खड्डयात पडले. याच कारणामुळे त्या हरीणाचा मृत्यू झाला. मात्र, हरीणाच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खूणा नव्हत्या. वन विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

फोटो गॅलरी