नालेसफाईत आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील दिरंगाई कंत्राटदाराला भोवली

यंदाच्या मॉन्सूनमध्ये मुंबई शहरात नेहमीपेक्षा नालेसफाईला उशिराने सुरूवात झाली. पण नालेसफाईत दिरंगाई केल्यासाठी आणखी एका कंपनीला मुंबई महानगरपालिकेने दंड ठोठावला आहे.
Mumbai Municipal Corporation
Mumbai Municipal CorporationSakal
Summary

यंदाच्या मॉन्सूनमध्ये मुंबई शहरात नेहमीपेक्षा नालेसफाईला उशिराने सुरूवात झाली. पण नालेसफाईत दिरंगाई केल्यासाठी आणखी एका कंपनीला मुंबई महानगरपालिकेने दंड ठोठावला आहे.

मुंबई - यंदाच्या मॉन्सूनमध्ये मुंबई शहरात नेहमीपेक्षा नालेसफाईला उशिराने सुरूवात झाली. पण नालेसफाईत दिरंगाई केल्यासाठी आणखी एका कंपनीला मुंबई महानगरपालिकेने दंड ठोठावला आहे. नियोजित उदिष्टापेक्षा धीम्या गतीने काम केल्यासाठी भूमिका कंपनीला मुंबई महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पण नोटीशीवर समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यानेच मुंबई महानगरपालिकेकडून कंत्राटदार कंपनीला साडेतीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेने नालेसफाईसाठी ७५ टक्के उदिष्ट हे ३१ मे पर्यंत ठेवले आहे. पण या कामात कंत्राटदार कंपनीने उशीर केल्याचे स्पष्ट झाले आहे. नालेसफाईच्या कामात वरळी, दादर, माहिम आणि वरळीत धीम्या गतीने काम केल्यासाठी कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे.

यंदा मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई ही दरवर्षीच्या तुलनेत जवळपास आठवड्याने उशीरा सुरु झाली. नालेसफाईत मुंबई शहर यंदा खूपच पिछाडीवर होता. पण वारंवार बैठका घेत तसेच अतिरिक्त यंत्रणा कामाला लावत मुंबई शहरातील नालेसफाईला वेग आला होता. पण कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला मात्र मुंबई महानगरपालिकेने चांगलाच धडा शिकवला आहे. मुंबई शहरात काम करणाऱ्या भूमिका कंपनीला साडेतीन लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या डॅशबोर्डनुसार शहरातील नाल्यातील ८७.१२ टक्के गाळ काढण्यात आला आहे.

मॉन्सूनपूर्व ३१ मे पर्यंत ७५ टक्के नालेसफाईचे टार्गेट ठेवण्यात आले असून मनुष्यबळ व मशीन्स वाढवण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी कंत्राटदारांना दिले होते. मोठ्या नालेसफाईच्या कामासाठी ७ कंत्राटदार तर लहान मोठ्या नाल्याच्या सफाईसाठी २४ वॉर्डात २४ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक कंत्राटदाराला ३१ मे पर्यंत ७५ टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com