विमानतळ परिसरातील टोल बंद करण्याची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसरात जीव्हीके कंपनीने सर्व प्रकारच्या वाहनांकडून टोलच्या नावाखाली 130 रुपये वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. हा नाका त्वरित बंद न केल्यास शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार ऍड्‌. अनिल परब यांनी दिला आहे. 

विमानतळ परिसरात प्रवेश करताना प्रत्येक फेरीला 130 रुपये टोल वसूल करण्यात येत आहे. वाहनचालकांकडून पार्किंग चार्जही घेण्यात येत आहे. सर्व वाहने विमानतळ परिसरात जाऊन थांबत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून पैसे घेणे अयोग्य आहे. या बेकायदा वसुलीमुळे वाहनचालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. हे बंद न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परब यांनी जीव्हीके कंपनीला पत्राद्वारे दिला आहे. 

शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा 

विमानतळाच्या कामासाठी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा तात्पुरता सहार रोडवरील वेअर हाऊसमध्ये ठेवण्यात आला आहे. आता विमानतळाचे काम पूर्ण होत असल्याने हा अश्‍वारूढ पुतळा व त्याची माहिती विमानतळाच्या दर्शनी भागात असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे हा पुतळा पुन्हा येथे लावावा, अशी मागणीही परब यांनी जीव्हीकेकडे केली आहे.