‘मातोश्री’वर मुख्यमंत्र्यांचे प्रीतिभोज

मृणालिनी नानिवडकेर - सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

राजकीय तणावानंतर मनोमिलन; अधिवेशनात एकत्र सामोरे जाणार

मुंबई - वादळी ठरू शकणाऱ्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिमतीला चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे भाजपचे ज्येष्ठ मंत्री सरसावले असताना शिवसेनेने मनोमिलनाची संधी साधली आहे. युतीत कितीही तणाव असला, तरी अधिवेशनाला भाजप-शिवसेना एकत्रित सामोरे जाणार असून, आज या मनोमिलनाचे संकेत रात्री उशिरा झालेल्या प्रीतिभोजनात मिळाले.

दोन्ही पक्ष सरकारमध्ये एकत्र असले, तरी शिवसेनेने अनेकदा भाजपच्या विरोधात भूमिका घेतल्याने युतीमध्ये तणाव असल्याची चर्चा होती. मात्र, हा तणाव निवळण्यासाठी आता प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निमंत्रणावरून मुख्यमंत्री फडणवीस आज ‘मातोश्री’वर भोजनाला गेले होते. विस्तारात दिलेल्या सहकार्याबद्दल उद्धव यांचे आभार मानण्यासाठी दूरध्वनी केल्यावर ‘मातोश्री’कडून मुख्यमंत्र्यांना भोजनाचे आमंत्रण मिळाले आणि त्यांनीही ते स्वीकारले.

मुख्यमंत्र्यांच्या मदतीला ‘त्रिमूर्ती’

अधिवेशनात सरकारच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी विरोधक सरसावणार हे लक्षात घेत फडणवीस यांच्या मदतीसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे सक्रिय होणार आहेत. नारायण राणे यांचे विधान परिषदेतील आगमन हा सरकारसाठी चिंतेचा मुद्दा ठरू शकतो हे लक्षात घेत फडणवीस यांना एकट्यानेच बचावाचे काम करावे लागू नये यासाठी तीन मंत्री सरसावले आहेत.

शिवसेना देणार मुंबई, शेतकरी प्रश्‍नांवर भर

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी होणारे हे महत्त्वाचे अधिवेशन शिवसेनेने प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी उपयोगात आणायचे ठरवले आहे. मुंबईला अधिकाधिक सवलती द्या, तसेच ग्रामीण भागातील समस्यांवर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र, शिवसेना सरकारचा भाग आहे. त्यामुळे सरसकट टीका करणार नाही, तर भाजपला योग्य ते सहकार्य करू, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

Web Title: Devendra Fadnavis meets Uddhav Thackray

टॅग्स