नाराजीमुळे "मातोश्री' झुकली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

मुंबई - पक्षश्रेष्ठींकडून लादल्या गेलेल्या उमेदवारामुळे शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली होती. मात्र, उमेदवार मान्य नसल्यास राजीनामे द्या, असा दम मातोश्रीवरून दिला गेल्यावर अनेकांनी बंडाचे बाण पुन्हा भात्यात टाकले. मात्र, वरळीत महापौर स्नेहल आंबेकर यांच्या उमेदवारीमुळे निर्माण झालेल्या नाराजीपुढे मातोश्रीलाच झुकावे लागले. आयत्या वेळी महापौरांचा प्रभाग बदलण्याची वेळ मातोश्रीवर आली.

उमेदवारी वाटपावरून शिवसेनेत दोन दिवस तणावाचे वातावरण आहे. अनेक भागांतील नाराजांची समजूत काढण्यासाठी त्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले. त्यांची समजूत काढण्यात आली. तरीही लादलेल्या उमेदवारांच्या विरोधातला त्यांचा राग शांत झालेला नाही. अखेरीस निर्णय पटत नसेल, तर राजीनामे द्या, अशी तंबी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर अनेकांनी बंडाचे हत्यार म्यान केले. तरीही अनेक भागांत बंड झालेच. मातोश्रीने मुंबईतील अनेक बंडे मोडीत काढली असली तरी इतिहासात पहिल्यांदाच महापौरांचा प्रभाग बदलण्याची वेळ आली आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांना वरळी येथील 198 या एससी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांना आयत्या वेळी 195 क्रमांकाच्या प्रभागातून अर्ज भरावा लागला.

गडांमधील शिवसेनेचे बंडखोर
-वरळी ः नवनाथ करंदेकर (शिवसेना कार्यकर्ता)
-प्रभादेवी ः महेश सावंत (माजी शाखाप्रमुख)
-माहीम ः रोहिता ठाकूर (शाखा संघटक)
-शीव कोळीवाडा ः सुनील शेट्ये (उपविभाग प्रमुख)
-घाटकोपर-पश्‍चिम ः स्नेहल मोरे (माजी विभागप्रमुख सुधीर मोरे यांच्या वहिनी)

Web Title: displeasure in candidate