रिक्षाचालकांची दादागिरी सहन करणार नाही: परिवहनमंत्री दिवाकर रावते

रविंद्र खरात
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

कल्याण पश्चिम मोहिंदर काबुलसिंग चौकात गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास नो पर्किंगमध्ये पार्क करण्याऱ्या रिक्षा चालक राहुल कारंडे याला तेथील वाहतुक पोलिस नाईक नामदेव हिमगिरे याने 200 रूपयांचा दंड भरण्यासाठी सांगितले असता दोघात शाब्दिक चकमक उडाली यात राहुल कारंडे याने वाहतुक पोलिस नाईक हिमगिरे यांना शिविगाळ करत मारहाण केली होती. याप्रकरणात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रिक्षा चालक राहुल कारंडे याला अटक ही करण्यात आली आहे.

कल्याण : रिक्षा चालकांनी प्रवासी वर्गाशी सौजन्याने वागा, कायदा हातात घेतल्यास त्या रिक्षा चालकाचा समाचार पोलिस घेतील मात्र प्रवासी, वाहतुक पोलिस, बस चालकावर हल्ले करणाऱ्या रिक्षा चालकाचे लायसन्स, बॅच, परमिट रद्द करण्याचे आदेश दिल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सकाळला दिली. 

कल्याण पश्चिम मोहिंदर काबुलसिंग चौकात गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास नो पर्किंगमध्ये पार्क करण्याऱ्या रिक्षा चालक राहुल कारंडे याला तेथील वाहतुक पोलिस नाईक नामदेव हिमगिरे याने 200 रूपयांचा दंड भरण्यासाठी सांगितले असता दोघात शाब्दिक चकमक उडाली यात राहुल कारंडे याने वाहतुक पोलिस नाईक हिमगिरे यांना शिविगाळ करत मारहाण केली होती. याप्रकरणात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन रिक्षा चालक राहुल कारंडे याला अटक ही करण्यात आली आहे.

या हाणामारी प्रकरण व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर चांगलीच गाजला होता. याप्रकरणी राज्याचे दिवाकर रावते यांनी दखल घेतली असून कठोर कारवाईचे आदेश आरटीओ विभागाला दिले आहेत. याबाबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी संपर्क साधला असता सकाळशी बोलताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले की सध्या टॅक्सी आणि रिक्षाचे परमिट खुले केल्याने प्रवासी घेण्यावरुन संघर्ष वाढलाय याचा अर्थ असा नाही. रिक्षा चालकाने कायदा हातात घ्यावा, महिला प्रवासी वर्गाची छेड काढणे, भाड़े नाकारणे, वाढीव भाड़े घेणे, वाहतूक पोलिसांना मारहाण करणे, बस चालकाला मारहाण करणे या घटना ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरात घटना घडल्यावर जश्यास तसे उत्तर आम्ही दिले आहेत. तरीही रिक्षा चालक सुधारत नसतील तर त्यांच्या भाषेत यापुढे उत्तर देणार असल्याचा इशारा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला आहे.

कायदा हातात घेतला तर पोलिस आपल्या पध्दतीने त्या रिक्षा चालकाचा समाचार घेतील मात्र त्यानंतर आरटीओ त्या रिक्षा चालकाचे लायसन्स, परमिट, बॅच वेळ प्रसंगी रिक्षा जप्त करण्याचे आदेश अधिकारी वर्गाला दिले आहेत. याचा अर्थ असा नाही की सर्व रिक्षा किंवा टॅक्सी चालक बेशिस्त वागतात यामुळे सर्व सामान्य रिक्षा चालकाच्या व्यवसायावर ही परिणाम होत आहे. यासाठी सर्व रिक्षा संघटनानी बेशिस्त रिक्षा चालकाला समज द्यावा असे आवाहन ही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे. कल्याणमधील घटनेमध्ये आरटीओ आपल्या पध्दतीने रिक्षा चालकांचा समाचार घेतील असे स्पष्ट मत यावेळी रावते यांनी व्यक्त केल्याने आता कल्याण आरटीओमार्फ़त कल्याण डोंबिवलीमधील बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात क़ाय कारवाई केली जाते याकडे लक्ष्य लागले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :