दिवाळीसाठी पोलिस ठाण्यांची साफसफाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

शिव वाहतूक सेनेचे विभागप्रमुख जयप्रकाश अग्रवाल व युवा सेनेचे पदाधिकारी चेतन शर्मा यांनी मानखुर्द आणि ट्रॉम्बे वाहतूक पोलिस ठाण्याची साफसफाई केली; तसेच रांगोळी व विद्युत रोषणाईने पोलिस ठाणे सजविले

चेंबूर - सण किंवा उत्सव शहर पोलिस व वाहतूक पोलिस नेहमीच डोळ्यात तेल घालून नागरिकांची वाहतूक कोंडी व गर्दीतून सुटका करीत असतात. गणेशोत्सवात आणि दिवाळीत पोलिसांवर कामाचा जास्तच ताण असतो. हे लक्षात घेऊन शिव वाहतूक सेनेचे विभागप्रमुख जयप्रकाश अग्रवाल व युवा सेनेचे पदाधिकारी चेतन शर्मा यांनी मानखुर्द आणि ट्रॉम्बे वाहतूक पोलिस ठाण्याची साफसफाई केली; तसेच रांगोळी व विद्युत रोषणाईने पोलिस ठाणे सजविले. या वेळी फराळ वाटपही करण्यात आले. हा उपक्रम राबवून वाहतूक पोलिस व शहर पोलिसांनी एक आगळीवेगळी दिवाळी साजरी केली. या वेळी वाहतूक पोलिस अधिकारी, शहर पोलिस अधिकारी, पोलिस, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुंबई

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल दिरंगाईमुळे विद्यार्थी आणि पालकांचा मानसिक छळ होत असल्याने शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाचा...

08.09 AM

पनवेल  -  कंपनीतील प्रदूषणामुळे परिसरातील मानवी वस्तीबरोबरच श्‍वान- चिमण्यांसारख्या मुक्‍या प्राण्यांवरही विपरीत...

06.03 AM

नवी मुंबई - महापालिकेच्या विधी विभागात वकील आणि सामाजिक कार्यकर्ते यांची एक साखळी तयार झाली आहे. ती महापालिकेची लूट करत आहे...

04.33 AM