डॉक्‍टर व रुग्णांतील सुसंवादासाठी मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मुंबई - खासगी रुग्णालयांत रुग्णांची लूट होते. सरकारी रुग्णालयांत रुग्णांना सुविधा मिळत नाहीत. यामुळे रुग्णांचे हाल होतात. डॉक्‍टर आणि रुग्णांमध्ये सुसंवाद नसल्याने डॉक्‍टरांवरील हल्ले वाढले आहेत. हे लक्षात घेऊन "आवाज रुग्णांचा, निर्धार जनतेचा' ही मोहीम जनआरोग्य अभियान या संघटनेने सुरू केली आहे. ही मोहीम दोन टप्प्यांत राबवण्यात येईल.

रुग्णांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी सरकारी यंत्रणा नाही. ग्राहक मंच आणि मेडिकल कौन्सिल हे दोन पर्याय असले, तरी ते सक्षम नसल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या हक्कांसाठी पुढे यावे आणि सरकारकडून रुग्णांच्या तक्रारी दूर करण्यासाठी सक्षम पर्याय निर्माण करून घ्यावा, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात रुग्ण डॉक्‍टरांना "जादू की झप्पी' देऊन त्यांच्याबरोबर सेल्फी काढतील आणि तो सोशल मीडियावर शेअर करतील. दुसऱ्या टप्प्यात पुण्यातील महाविद्यालये, सोसायट्या आणि रुग्णालयांत नागरिक मतदान करतील. रुग्णांची लूट थांबावी आणि दाद मागण्यासाठी यंत्रणा असावी, यासाठी हे मतदान असेल. एक जुलैला या मतदानाचा निकाल जाहीर करण्यात येईल. या मतदानातून आलेल्या कौलाच्या आधारावर निवेदन तयार करून ते मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व आरोग्यासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी यांना देण्यात येणार आहे.

Web Title: doctor patient communication campaign