डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली

डोंबिवली पुन्हा स्फोटाने हादरली
डोंबिवली - प्रोबेस कंपनीतील स्फोटाच्या आठवणी कायम असतानाच, एमआयडीसी परिसर आज पुन्हा स्फोटाने हादरला. ऍल्यू-फीन कंपनीत कॉम्प्रेसरच्या स्फोटात दोन कामगार जखमी झाले. जखमींपैकी एका कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. फेज दोनमधील ऍल्यू-फीन कंपनीत ऍल्युमिनियमला कोटिंग केले जाते. सकाळच्या सत्रात या कंपनीत राजेंद्रसह चार कामगार होते. राजेंद्र हे कॉम्प्रेसरचा व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी गेले असताना स्फोट झाला. कंपनीतील कॉम्प्रेसरची हवा पास न झाल्याने हवेचा दाब निर्माण झाल्याने स्फोट झाल्याचा अंदाज आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती, की कॉम्प्रेसरचे भाग बाहेर उडाले. कंपनीच्या सर्व्हिस रोडलगतच्या मुख्य रस्त्यावरही पत्रे व अवशेष पडले होते. या स्फोटात राजेंद्र जावळे (वय 49) रा. सागाव, डोंबिवली गंभीर जखमी झाले. त्यांचा डावा पाय कमरेपासून निकामी झाला आहे. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com