जल्लोषपूर्ण वातावरणात एक लाख वृक्ष लागवडीचे महाअभियान संपन्न

संजीत वायंगणकर
बुधवार, 5 जुलै 2017

डोंबिवलीः ठाणे जिल्ह्यातील पहिले निसर्ग उद्यान साकारण्याच्या दृष्टीने हिरवेगार मानवनिर्मित जंगल तयार करुन जलसंवर्धना पाठोपाठ पर्यावरण संवर्धनाकडे आज (बुधवार) लोकसहभागातून वृक्षारोपण करुन वाटचाल करत आहोत. यामुळे येत्या काळात कमी पाऊस, दुष्काळ, ग्लोबल वार्मिंग, वाढते प्रदुषण अशा सर्व समस्यांवर आपण मात करु शकतो, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

डोंबिवलीः ठाणे जिल्ह्यातील पहिले निसर्ग उद्यान साकारण्याच्या दृष्टीने हिरवेगार मानवनिर्मित जंगल तयार करुन जलसंवर्धना पाठोपाठ पर्यावरण संवर्धनाकडे आज (बुधवार) लोकसहभागातून वृक्षारोपण करुन वाटचाल करत आहोत. यामुळे येत्या काळात कमी पाऊस, दुष्काळ, ग्लोबल वार्मिंग, वाढते प्रदुषण अशा सर्व समस्यांवर आपण मात करु शकतो, असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले.

आपला परिसर हिरवागार करण्याचं स्वप्न घेऊन अफाट जनसमुदायाच्या साथीने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज श्रीमलंग गडपरिसरातील मांगरुळ गावातील वन जमीनीवर एक लाख झाडे लावण्याचे महाअभियान अतिशय जल्लोषात आणि शिस्तबद्ध रीतीने संपन्न झाला. या वृक्षारोपण अभियानात पंधरा हजारहून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. केवळ वृक्षारोपण करून थांबणार नसून ही झाडे जगवून येत्या पाच वर्षांत या परिसराचे रुपांतर मानवनिर्मित देखण्या वनराईत करण्याची ग्वाही देखील खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे या विधायक उपक्रमास शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मांगरूळ येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या पर्यावरणाच्या दिंडीतील वारकऱ्यांमुळे यासंपूर्ण परिसराला वृक्ष पंढरीचे स्वरूप लाभले होते.

विधायक कार्याच्या पाठीशी जनशक्ती उभी राहिली की काय चमत्कार घडू शकतो, याची प्रचीतीच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आली. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, दिव्यज्योती ट्रस्ट, सीए असोसिएशन, एनएसएसचे विद्यार्थी, विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, महिला बचत गट, प्रजापिता ब्रह्मकुमारीचे साधक, ज्येष्ठ नागरिक संघ, अंगणवाडी स्वयंसेविका आदी 15 हजारहून अधिक जणांचा सहभाग असूनही कुठलाही गोंधळ न होता, अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने अवघ्या दोन तासांमध्ये एक लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले.

सकाळपासूनच प्रत्येक स्वयंसेवक हातात रोपटे घेऊन मांगरुळचा डोंगर चढताना दिसत होता. छोटा-मोठा प्रत्येकजण हातात रोपटे घेऊन नेमून दिलेल्या जागी वृक्षारोपणास सज्ज होता. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असावा, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. ऊन पावसाच्या सुरू असलेल्या खेळाचा धागा पकडून निसर्गाचीही या उपक्रमाला साथ असल्याची मार्मिक टिप्पणी त्यांनी केली.

लोकांची शक्ती एकवटली कि किती मोठे विधायक कार्य उभे राहू शकते, हे या उपक्रमाच्या माध्यमातून दिसून आले आहे, अशा शब्दांत पालकमंत्री श्री शिंदे यांनी कौतुकाची पावती दिली. भारतात आज प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रतिव्यक्ती झाडांचे प्रमाण भारतापेक्षा चीनमध्ये जास्त आहे. निदान याबाबतीत तरी चीनच्या पुढे जाण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया, असे आवाहनही श्री शिंदे यांनी केले.

पर्यावरणाचे संवर्धन हे केवळ शासनाचे काम नसून प्रत्येक व्यक्तीने त्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर आणि मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी याकार्यक्रमासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. उपमुख्य वन संरक्षक जितेंद्र रामगावकर यांनी मांगरूळ येथे 85 एकर वन जागा उपलब्ध करून दिली. खासदार डॉ. शिंदे यांनी विविध संस्था-संघटना, शाळा, महाविद्यालये यांना आवाहन केले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह सातत्याने बैठका घेतल्या.ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालय आणि आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या 700 हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले.  महाराष्ट्र नेचर पार्कचे उपसंचालक अविनाश कुबल यांचे विशेष सहकार्य या अभियानाला लाभले.ठाणे जिल्हाधिकारी ,वन विभाग व कल्याण लोकसभेचे खासदार  यांच्या संयुक्त नियोजनात पार पडलेल्या या कार्यक्रम प्रसंगी आमदार सुभाष भोईर, डॉ. बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, महापौर राजेंद्र देवळेकर, मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उपमुख्य वन संरक्षक जीतेंद्र रामगावकर, मांगरुळच्या सरपंच नंदिता पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेते संतोष जुवेकर, मंगेश देसाई, उदय सबनीस, दिग्दर्शक विजू माने आदींची विशेष उपस्थिती या महाअभियानाला लाभली.

पावसाळ्यात खड्डे पडले कि....
पावसाळ्यात खड्डे पडले कि महापौरांच्या नावाने खडे फोडले जातात. पण इथे या लाखो खड्ड्यात वृक्ष लावून एक नवा विक्रम होत आहे. कदाचित आज-उद्या या कार्याचे महत्व कळणार नाही. पण ४०-५० वर्षांनंतर समजेल कि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपक्रमामुळे हि झाडे, जंगले दिसत आहेत. भविष्यात पुढे सर्व काही बदलेल पण हि जगलेली झाडे तशीच राहतील आणि राहिली पाहिजेत. कारण विकासाच्या नावाखाली वृक्षांची कत्तल होता कामा नये. विकास व्हायला पाहिजे पण त्याचबरोबर जंगलेही राहिली पाहिजेत.
- आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख.

वृक्ष लागवड हि काळाची, समाजाची व पर्यावरणाची गरज आहे. आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी होते आणि उद्धवसाहेबही तेच काम करीत आहेत. वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. आणि यासाठीच हे सर्व सुरु आहे. मुख्य म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष एक लाख पेक्षा जास्त वृक्ष लागवड झाल्याचा आनंद होत आहे आणि हा एक विक्रम आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वृक्ष लागवड होते पण इथे जी शिस्त आणि हजारो लोकांचा सहभाग आगळा-वेगळा आहे. आता आपल्याला झाडं लावून थांबायचं नाही तर जलयुक्त शिवार माध्यमातून कामं केली जात आहेत. जलयुक्त शिवरामुळे भाजीचे मळे फुलले आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. झाडं लावून थांबू नका, झाडं जागवून त्यांची जंगलं झाली पाहिजे आणि पुढे मांगरूळ एक पर्यटन स्थळ झालं पाहिजे.
- पालकमंत्री एकनाथ शिंदे

परिसर स्वच्छतेचे भान
एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी व स्वयंसेवकांनी खाऊचे रॅपर, पाण्याचे रिकामे ग्लास व बाटल्या सर्वांना वाटण्यात आलेल्या केळीची साले असा सर्व कचरा गोळा करुन संपूर्ण परिसर स्वच्छ केला व पर्यावरण रक्षणाचा चांगला संदेश सर्वांपर्यंत पोहचवला.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:ञ
'जिओ' देणार 309 रुपयांत रोज 1 GB डेटा
बिअर आरोग्यासाठी उत्तम, सिद्ध करुन दाखवतो: आंध्रचे मंत्री
विट्यातील सर्व यंत्रमाग 8 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय​
गिरीश महाजन यांच्या बनावट 'पीए'ला अटक​
सत्ता केंद्रे गेली तरी राष्ट्रवादीत गटबाजीचा पिळ कायम !​
'जीएसटी' म्हणजे 'गई सेव्हिंग तुम्हारी' : राहुल गांधी​
भाजपच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा​

'आप का स्वागत हैं मेरे दोस्त,': इस्राईलकडून मोदींचे ऐतिहासिक स्वागत..!
शोध अण्वस्त्रविरहित जगाचा​
पंचविशीतली मराठी तरूणाई उद्योगाच्या वाटेवर!​
गाव पातळीवरील राजकारणाला वेगळं वळण... आता सरपंचही जनतेतून​