कचरा टाकण्यावरून महिलेची हत्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

डोंबिवली - घरासमोर कचरा टाकण्यावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर एका महिलेची लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली. 

डोंबिवली - घरासमोर कचरा टाकण्यावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर एका महिलेची लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली. 

आयरे गावात ही घटना घडली. सुनंदा प्रकाश लोकरे (वय 45) असे मृत महिलेचे नाव आहे. ती ओम साई चाळीत राहते; तर या चाळीतच आरोपी रवींद्र मसूरकरही राहतो. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास घरातून काढलेला कचरा बाहेर टाकण्यावरून सुनंदा व रवींद्र यांच्यात बोलाचाली झाली. त्यातून हा वाद विकोपाला गेला. या भांडणावेळी रागाच्या भरात रवींद्रने लोखंडी रॉड आणून सुनंदाच्या डोक्‍यावर आपटला. त्यानंतर तो पळून गेला. सुनंदा यांच्यावर हल्ला झाल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यांना तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र त्याआधीच सुनंदा यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पळालेला आरोपी रवींद्र याला अटक केली. 

टॅग्स