अमली पदार्थांविरोधात वांद्य्रात रविवारी मॅरेथॉन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई :  नरसी मोनजी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि सोशल रिस्पॉन्सिबिल्टी फोरमच्या वतीने आरंभ उपक्रमांतर्गत येत्या रविवारी (ता. 29) वांद्रे येथे मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली आहे. "सकाळ' माध्यम समूह या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत. 

अमली पदार्थ आणि त्याच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अमली पदार्थ सेवन हा एक आजार असून, त्यापासून दूर जाण्यासाठी केवळ इच्छाशक्तीच नाही तर सामाजिक आधार आणि उपचार या दोघांचाही मेळ गरजेचा असतो. याबाबत नागरिकांमध्ये अधिकाधिक सतर्कता निर्माण व्हावी, या हेतूने हा अभिनव उपक्रम घेण्यात आला आहे. याचबरोबर संकल्प या सामाजिक संस्थेचे सहकार्यही या उपक्रमामध्ये आहे. दर वर्षी पाच किलोमीटर असलेली मॅरेथॉन वांद्रे बॅण्ड स्टॅण्डपासून सुरू होते. अमली पदार्थांची किंमत वेगवेगळ्या पातळीवर समाजाला मोजावी लागते. त्यामुळे या संबंधित जागरुकता आवश्‍यक आहे. रविवारी (ता. 29) सकाळी 6.30 वाजता ताज लॅण्डस एन्ड बॅण्ड स्टॅण्ड येथून मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.