ड्रग रेझिस्टंट टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ

TB-Patient
TB-Patient

नवी मुंबई - वाढत्या शहरीकरणासोबतच औद्योगिकीकरण व मद्यप्राशनामुळे रेझिस्टंट टीबीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ पल्मनॉलॉजी मेडिकल रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटतर्फे नुकतेच मुंबईत १२ व्या ‘इंटरनॅशनल पल्मनॉलॉजी लीग- २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या तज्ज्ञांकडून हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. 

टीबीच्या आजारावर अद्ययावत तंत्रज्ञानाबाबतची माहिती वैद्यकीय चिकित्सकांना देण्यासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातील पल्मनॉलॉजी क्षेत्रातील सुमारे २४० डॉक्‍टर्स या तीनदिवसीय सत्राच्या निमित्ताने सहभागी झाले होते. एस. एल. रहेजा हॉस्पिटल, माहीम आणि वाशी हिरानंदानी हॉस्पिटल, प्रकल्प संचालक, डॉ. प्रशांत छाजेड यांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्र पार पडले. प्लुरोस्कोपीसारख्या नवीन तंत्रज्ञानाने निदान होऊ शकेल, अशा ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्‍युलोसिस, फुप्फुसांमध्ये पाणी होणे इत्यादी विविध पल्मनरी आजारांच्या निदान आणि उपचारांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या विविध हस्तक्षेपात्मक तंत्रांबाबत सत्रांमध्ये चर्चा करण्यात आली. गंभीर अस्थम्यासारख्या आजारांवर उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या ब्रॉन्कियल थर्मोप्लास्टिकसारख्या तंत्रज्ञानावर; तसेच इंटरस्टिटियल लंग डिसीजच्या निदानासाठी लंग क्रायोबायोप्सी यांच्यावरही या वेळी चर्चा करण्यात आली.  टीबीसारख्या आजारावर तितक्‍या यशस्वीपणे नियंत्रण करता आले नाही. परंतु टीबीच्या व्यवस्थापनामध्ये ड्रग रेझिस्टंट टीबीच्या व्यवस्थापनावर परिणाम करणारे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान म्हणजे इबस-टीबीएनए विकसित करण्यात आले आहे.

काय आहे इबस टीबीएनए प्रक्रिया
एंडोब्रोन्किल्युट्रासाऊंड टान्सब्रॉन्कियल नीडर एस्पायरेशन म्हणजेच इबस टीबीएनए प्रक्रिया होय. ही एक अशी प्रक्रिया आहे, जी स्थानिक एनेस्थेशियाअंतर्गत भूल देऊन केली जाते आणि डे केअरमध्ये त्यावर उपचार होतात. त्यातून सूक्ष्म जैवशास्त्रीय, मोलेक्‍युलर आणि पॅथॉलॉजिकल तपासणीसाठी नमुने दिले जातात. त्यामुळे अचूक निदान होते आणि एम्पिरिक उपचार (निदानावर आधारित) टाळता येतात.

भारतात फुप्फुस आणि छातीच्या आजारांनी ग्रस्त लोकांची संख्या फार मोठी आहे. त्याचे प्रमुख कारण पर्यावरणीय घटक आहेत, असे मला वाटते. धूम्रपान हे दुसरे कारण आहे. पहिले आणि सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे धूम्रपान आणि प्रदूषण आहे. जर्मनी आणि युरोपात २५ टक्के लोक धूम्रपान करतात. भारतात मोठ्या प्रमाणावर उपचार केंद्रे असून ती पाश्‍चिमात्य देशांशी तुलनात्मक आहेत.
- प्रा. डॉ. फेलिक्‍स हर्थ, जर्मनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com