48 लाखांचे एमडी ड्रग्ज घाटकोपरमध्ये जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

मुंबई: घाटकोपर परिसरात एमडी या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चार जणांना घाटकोपर अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) शुक्रवारी (ता.17) अटक केली. त्यांच्याकडून 48 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

सन्नी ऊर्फ आसिफ गुलाम अन्सारी, यतीन संघवी, सॅयमूल पाठक ऊर्फ सॅम, दिलविंदर अजमेरसिंग ऊर्फ जग्गी सिंग अशी आरोपींची नावे आहेत. चारही आरोपींना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

घाटकोपर बस डेपोजवळ एमडी अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची माहिती घाटकोपरच्या एएनसीला मिळाली होती. पोलिस उपायुक्त (अमली पदार्थविरोधी कक्ष) शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिलीप सावंत, उपनिरीक्षक बबन सानप यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी (ता.17) तेथे सापळा रचला. एका वाहनातून सायंकाळी दोन जण बस डेपोजवळ उतरले. काही वेळाने आणखी दोन जण तेथे आले. पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. चौघांनाही चौकशीकरिता ताब्यात घेऊन चौकशी केली असता सन्नी आणि यतीन अमली पदार्थ तस्करीतील मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. सन्नी मोबाईल दुरुस्ती; तर यतीन औषध कंपनीत कामाला आहे. सॅम बेरोजगार आहे, तर दिलविंदर एसी मॅकेनिक आहे. जप्त केलेले एमडी ड्रग्ज पंजाब आणि गुजरातमधून मुंबईत आणले होते. पोलिसांनी 45 दिवसांत 21 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे.

मुंबई

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये स्वाईन फ्लूच्या शिरकावामुळे झालेले दोघांचे मृत्यू आणि उखडलेल्या रस्त्यांच्या समस्येवरून सत्ताधारी आणि...

03.27 AM

कल्याण  -दोन दिवसांनंतर गणपती बाप्पांचे आगमन होणार असून त्यापूर्वीच डोंबिवलीतील नागरिकांना डोंबिवली पूर्व रेल्वेस्थानक...

02.24 AM

कोपरखैरणे  - नवी मुंबई परिसरात साखळी चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना नेरूळ ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सात लाख...

12.27 AM