दीड कोटींचे ड्रग्स पुरवणारा नायजेरियन ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

मंबई - दीड कोटींच्या अमली पदार्थांसह आफ्रिकी महिलेला अटक केल्यानंतर तिला अमली पदार्थ पुरवणाऱ्याला पकडण्यात केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाला (एनसीबी) यश आले आहे. वेनेसा डी कॉक या दक्षिण आफ्रिकी महिलेला रविवारी (ता.26) मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली होती. तिच्याकडे दक्षिण आफ्रिकेचे पारपत्र होते. केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी) यांनी दिलेल्या माहितीवरून एआययूने ही कारवाई केली. ही महिला युथोपियन एअरवेजने अदिस अबाबा येथे जाण्यास निघाली होती. तिच्याकडील बॅगांच्या तपासणीत 10 कार्डबोर्डच्या पाकिटांमध्ये अमली पदार्थ सापडले. सलवार सूटच्या कपड्यांमध्ये पाकिटे लपवण्यात आली होती. आरोपी महिलेला एनसीबीच्या ताब्यात देण्यात आले होते. याप्रकरणी या महिलेला ड्रग्स पुरणाऱ्या नायजेरियन नागरिकाला एनसीबीने ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टॅग्स