पावसाअभावी सोयाबीन पिक शेतकऱ्यांच्या हातातुन गेले

2Soyabean_5.jpg
2Soyabean_5.jpg

वाशी : पावसाअभावी सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातुन गेले आहे. सोयाबीन काढायला परवडत नसल्याने शेतकरी सोयाबिनच्या उभ्या पिकात रोटावेटर घालुन जमिनीची नागरणी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडणार आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तात्काळ सोयाबीनचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.

येथील अल्पभुधारक शेतकरी विजया विवेकानंद उंदरे यांना चार एकर जमीन असुन त्यांनी साडे तीन एकर जमिनीमध्ये सोयाबिनची पेरणी केलेली आहे. माञ सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या कालावधीमध्ये परिसरात पावसाने उघडीप दिल्याने सोयाबिनच्या शेंगामध्ये दाणे भरलेले नाहीत. या सोयाबीनची काढणी व मळणीसाठी होणारा खर्चही या पिकातुन मिळाणार नसल्याची खाञी पटल्यानतंर उंदरे यांनी आपल्या साडेतीन एकरवरील सोयाबीनमध्ये रोटावेटर घालुन सोयाबीन मोढुण काढले आहे.अशीच परिस्थिती इतर शेतकऱ्यांची आहे.

खरीपातील मुख्य पिक व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देणारे सोयाबीनचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळण्याच्या अपेक्षा जवळपास संपलेल्या परिसरात सोयाबीन पिकासाठी आवश्यक असणारा पाऊस झालेला नसल्याने सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट होऊन बी बियाने खते मजुरी यासाठी केलेला खर्चही मिळेल की नाही याची चिंता शेतकऱ्यांना सतावत असतानाच सोयाबीन काढणीच्या मंजुरीमध्येही मोठी वाढ झालेली असल्याने सोयाबीन काढणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकरी रोटावेअरच्या साह्याने सोयाबीन पिक मोढुन काढत आहेत.

मागील काही वर्षापासुन शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील शेतकरी सोयाबीनच्या पिकातुन मिळणाऱ्या उत्पन्नावर संपुर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन करतात. माञ नगदी पिक म्हणुन ओळख असलेल्या सोयाबीच्या पिक हातुन जात असल्याचे पाहुन पुढील वर्षभरासाठीचा घर खर्च मुलांचे शिक्षण दवाखाना सण उत्सव यासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com