उंदरांची उपासमार करा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

मुंबई - अस्वच्छतेमुळेच शहरात उंदीर आणि घुशींचे प्रमाण वाढले असून, घर परिसर स्वच्छ ठेवल्यास; तसेच त्यांना सहज खाद्य उपलब्ध होऊ न दिल्यास उंदरांची उपासमार होऊन त्यांची संख्या आपोआप कमी होईल, असा सल्ला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिला आहे. गेल्या सात महिन्यांत महापालिकेने मुंबईत तब्बल एक लाख नऊ हजार उंदीर मारले आहेत.

नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी चाळीमध्ये उंदरांचा उपद्रव वाढला असून हा त्रास रोखण्यासाठी पालिकेने ठोस प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी ठरावाची सूचना मांडली होती. त्यावर प्रशासनाने महासभेत अहवाल सादर केला आहे. त्यात उंदरांची उपासमार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्‍यावर नरवणकर यांनी नाराजी व्यक्त केली.

मूषक नियंत्रणासाठीचे उपाय...
ज्या ठिकाणी खाण्यास अन्न निर्माण होते, त्या ठिकाणी उंदरांची संख्या वाढते. उंदरांची संख्या कमी करायची झाल्यास त्यांना सहज खाद्य मिळाले नाही पाहिजे. उंदीर व घुशीची संख्या कमी व्हावी, यासाठी परिसरात स्वच्छता राखली पाहिजे. स्वयंपाकघरातील कचरा कुंडीतच टाकावा, उघड्यावर कोणतेही खाद्यपदार्थ ठेवू नयेत, घरांमध्ये आणि इमारतींमध्ये मूषकरोधक बसावावेत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

आकडेवारी अशी
 एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात एक लाख नऊ हजार २१३ उंदीर मारण्यात आले.
 मुषक नियंत्रणासाठी २३ कनिष्ठ अवेशक, १३१ मूषकनाशक आणि ३१ रात्रपाळी मूषकसंहारक कार्यरत.
 वर्षाला सुमारे १० ते १२ हजार तक्रारी नागरिक करतात.
 बिळांच्या परिसरात विषारी औषध टाकून, पिंजरे लावून अथवा काठीने उंदीर मारले जातात.

Web Title: Due to sanitation rats have increased in the city