‘कौल’च्या चित्रीकरणासाठी ‘दस का दम’

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

मुंबई - ‘कौल’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण केवळ १० जणांनी केले आहे. हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. लेखक व दिग्दर्शक आदिश केळुसकरने ‘कौल’ चित्रपटाची कथा निर्माते चिंटू सिंग यांना ऐकवली. त्यांना आदिशला काय म्हणायचे आहे, हे कळलेच नाही; मग त्याने स्वत:च चित्रीकरण करण्याचे ठरवले. 

आई उमा केळुसकर यांच्याकडून थोडे पैसे घेऊन त्याने चित्रीकरण सुरू केले. कार्यकारी निर्माता, सिनेमॅटोग्राफर, त्याचा सहायक, साऊंड डिझायनर, त्याचा सहायक आणि चार कलाकार यांच्यासह चित्रीकरण केले. कोकणात हे चित्रीकरण झाले. ते चिंटू सिंग यांनी पाहिले. त्यांना आदिशचे काम आवडले आणि त्यांनी चित्रपटाच्या पुढील प्रक्रियेसाठी सहकार्य केले. त्यानंतर वेगळ्या टीमने या चित्रपटाची निर्मिती पूर्ण केली. आदिश म्हणाला, ‘चित्रपटासाठी छोटी टीम असावी असे काही ठरवले नव्हते. टीम छोटी असल्यास काम नीट होते असे वाटते. माझ्यासाठी चित्रपट करणे हा खूप जिव्हाळ्याचा अनुभव असतो. चित्रीकरणाला कमी जणांची टीम असली, तरी त्यानंतर खूप लोकांनी काम केले आहे.’