एकनाथ खडसे रामराजेंच्या भेटीला, मतांचा कोटा बदलणार?

Sharad Pawar Ramraje Nimbalkar Eknath Khadse
Sharad Pawar Ramraje Nimbalkar Eknath KhadseSakal

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकांसाठीची चुरस वाढू लागली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने केलेली खेळी यशस्वी झाली. यामुळे महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं. शिवसेनेचा उमेदवार पडल्याने महाविकास आघाडीचीच नाचक्की झाली. त्यामुळे २० जुलैला पार पडणाऱ्या विधानपरिषद निवडणुकांसाठी मविआने ताकद पणाला लावली आहे. गुप्त पद्धतीने मतदान होणार, हे क्लिअर असल्याने सगळ्यांनीच भेटीगाठींना सुरुवात केली आहे. (Ajit Pawar in MLC Election 2022)

यंदा महाविकास आघाडीच्या वतीने अजित पवारच मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार निवडून आणण्याची जबाबदारीही दादांवरच आहे. सध्याचं संख्याबळ पाहता रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र एकनाथ खडसे यांचं पारडं अगदी कट-टू-कट आहे. त्यामुळे मतं फुटल्यास खडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो. (MLC election 2022 Latest News)

Sharad Pawar Ramraje Nimbalkar Eknath Khadse
विधान परिषदेसाठी अजित पवार मैदानात, काँग्रेससोबत बैठक संपताच फोन फिरवला

दरम्यान सर्व पक्षांचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. यातच आता राष्ट्रवादीने नेते व विधानपरिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे हे सभापती रामराजे निंबाळकर यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी निंबाळकर आणि खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खडसे अचानक रामराजेंची भेट घेणार असल्याने राष्ट्रवादीतून नव्या समीकरणांची जुळवाजुळव होण्याची शक्यता वाढली आहे.

आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रायडेन्ट हाॅटेलला बैठक होणार आहे. त्याआधीच खडसे आणि रामराजेंची भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळी पार पडणाऱ्या बैठकीला राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

विधानपरिषदेवर जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला २७ मतांची गरज आहे. राष्ट्रवादीकडे सध्या ५४ आमदार आहेत. यातील पहिल्या पसंतीची मतं रामराजे यांना गेल्यास उर्वरीत मतांवर खडसेंना भागवावं लागणार आहे. मात्र, २७ मतांचा आकडा पूर्ण करण्यासाठी खडसेंना अतिरिक्त दोन मतांची गरज भासू शकते. ऐनवेळी राष्ट्रवादीकडून रामराजेंच्या मतांचा कोटा वाढवण्यात येऊ शकतो. मतं बाद होण्याचं प्रमाण, मतं फुटण्याची शक्यता लक्षात घेता खडसेंनाही त्यांच्यासाठी मतांची बेगमी करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com