नवी मुंबई, ठाणे, मुंबईसाठी ‘यिन’च्या जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’ (यिन) च्या महाविद्यालयीन स्तरावर निवडून आलेल्या प्रतिनिधींतून सोमवारी (ता. १४) रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईसाठी जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. ते राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. ‘यिन’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक संदीप काळे, मुख्यमंत्री संदीप पालवे, रायगड जिल्हा समन्वयक गणेश घोलप आणि ठाणे जिल्हा समन्वयक शुभम पवार उपस्थित होते.

मुंबई - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर नेटवर्क’ (यिन) च्या महाविद्यालयीन स्तरावर निवडून आलेल्या प्रतिनिधींतून सोमवारी (ता. १४) रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईसाठी जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. ते राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. ‘यिन’चे महाराष्ट्र राज्य समन्वयक संदीप काळे, मुख्यमंत्री संदीप पालवे, रायगड जिल्हा समन्वयक गणेश घोलप आणि ठाणे जिल्हा समन्वयक शुभम पवार उपस्थित होते.

बेलापूर येथील ‘सकाळ भवन’मध्ये लेखी परीक्षा, मुलाखतीबरोबरच वक्तृत्वकौशल्य तपासण्यात आले. यातून रायगड जिल्हा अध्यक्षपदी अल्फिया चाफेकर व सूरज पाटील, तर उपाध्यक्षपदी विनित महाजन आणि स्वप्नील जाधव यांची निवड झाली. नवी मुंबई जिल्हा अध्यक्षपदी अक्षय रायकर आणि साहिल साठे, तर उपाध्यक्षपदी ऋषीकेश माने आणि औचित्य राक्षसे यांनी बाजी मारली. ठाणे जिल्हा अध्यक्षपदी कल्पेश कवले आणि आकाश घाडगे यांची, तर मुंबई जिल्हा अध्यक्षपदी रोनक जाधव आणि कृष्णा नलावडे यांची निवड झाली आहे. हे सर्व प्रतिनिधी ‘यिन’साठी राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या सर्व प्रतिनिधींनी वक्तृत्वकौशल्य, मुलाखत आणि लेखी परीक्षेतून स्वत:ला सिद्ध केले. तरुणांतील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या उद्देशाने महिन्याभरापूर्वी जिल्ह्यांतील महाविद्यालयांत ‘यिन’तर्फे निवडणूक घेण्यात आली होती. त्यातून निवडून आलेल्या प्रतिनिधींतून जिल्हा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.

वेध मंत्रिमंडळाचे
सोमवारी ‘यिन’ जिल्हा प्रतिनिधींची निवड झाली. आगामी काळात मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. यात मुख्यमंत्री आणि इतर खात्यांच्या मंत्रिपदासाठी लढत होणार आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचे वेध या प्रतिनिधींना लागले आहेत.

‘यिन’द्वारे तरुणांतील नेतृत्वगुणांना वाव दिला जात आहे. ‘यिन’सोबत मोठ्या प्रमाणात तरुणाई जोडली जात आहे. यासाठी सकाळ माध्यम समूहाचे मन:पूर्वक आभार मानतो.
- ऋषीकेश माने, जिल्हा उपाध्यक्ष, ‘यिन’ नवी मुंबई
...
‘यिन’ मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद झाला आहे. तरुणांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी याचा उपयोग करू.
- अल्फिया चाफेकर, जिल्हा अध्यक्ष, ‘यिन’ रायगड

मुंबई

कल्याणः प्लास्टिकची अंडी, चीनी अंडी, अंडयात प्लास्टिक निघाले अशा तक्रारी गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. तीन ठिकणांहून...

04.45 PM

कल्याणः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर रेल्वे प्रशासन नुसार प्रत्येक रेल्वे स्थानक परिसरात 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट...

04.09 PM

मुंबादेवी : 'सकाळ'च्या प्लॅस्टिकमुक्त वसुंधरा अभियानास उमरखाडी येथे सर्व गोविंदा पथकांकडून भरघोस प्रतिसाद लाभला.येथील गणेश...

12.00 PM