वीजबिल थकवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - सरकारी निवासस्थान सोडताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वीजबिलाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडे सादर करावे लागणार आहे. या संदर्भात राज्य सरकारने मंगळवारी परिपत्रकद्वारे आदेश जारी केले आहेत. सरकारी निवासस्थान सोडताना अनेक अधिकारी आणि कर्मचारी वीजबिले थकवतात, असे आढळून आले आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: electricity bill arrears certificate