वीज ग्राहकांसाठी विशेष मदत कक्ष 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

मुंबई - महावितरणच्या ग्राहकांना नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळावी आणि याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडवली जावी आणि ग्राहकनावात बदल करण्यासाठी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात "विशेष मदत कक्ष' सुरू करण्यात आला आहे. 

महावितरणच्या नवीन ग्राहकांना वीज जोडणी घेताना आणि नावात बदल करताना अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांच्या निर्देशानुसार अशा ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी हा "विशेष मदत कक्ष' सुरू करण्यात आला आहे. नवीन वीजजोडणीबाबत येणाऱ्या अडचणींबाबत या कक्षाद्वारे संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा करता येणार आहे. ग्राहकांच्या नावात बदल, पैसे भरून नवीन वीजजोडणी न मिळालेल्या ग्राहकांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी या "विशेष मदत कक्षा'द्वारे मदत करण्यात येईल. यासाठी 022-26478989 व 022-26478899 या दूरध्वनी क्रमांकांवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स