ईमान अहमदचे वजन 242 किलोने झाले कमी

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबई - जगातील सर्वाधिक वजन असलेल्या इजिप्तमधील ईमान अहमद या महिलेचे दोन महिन्यात 242 किलो वजन कमी झाले आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. डॉ. मुफज्जल लकडावाला हे ईमानवर उपचार करत आहे.

ईमानला (वय 36) 11 फेब्रुवारी रोजी विशेष विमानाने उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आले. त्यावेळी तिचे वजन 498 किलो होते. मुंबईत आल्यानंतर अवघ्या एक महिन्यातच कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय तिचे वजन 112 किलोने कमी झाले होते. 7 मार्च रोजी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर महिनाभरात 130 किलोने वजन कमी झाले आहे. सध्या तिचे वजन 256 किलो आहे.

डॉ. मुफज्जल लकडावाला म्हणाले, 'ईमानचे वजन कमी झाल्यामुळे हृदय, मुत्राशय व शरिरातील विविध अवयवांचे काम नियंत्रणाखाली आले आहे. तिचे वजन कमी झाल्यामुळे तिचे शरीर आता एमआरआय मशिनमध्ये जाऊ शकेल. वजन कमी करण्यासाठी तिला मागील एक महिन्यापासून लिक्विड डाएटवर ठेवण्यात आले. शरीरातील अतिरिक्त पाणी निघून गेल्याने तिचे वजन कमी झाले. लवकरात लवकर ती व्यवस्थित होऊन इजिप्तला जाऊ शकेल.'

कोण आहे इमान अहमद?
ईमानचा जन्म 1980 साली झाला. जन्मावेळी तिचे वजन तब्बल पाच किलो होते. तिला थायरॉइडचा त्रास होता. त्यामुळे तिला शालेय शिक्षणही थांबवावे लागले. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवश्‍यक ते उपचार घेण्यासाठी तिला विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. पहिल्या मजल्यावरील तिच्या घराची भिंत फोडून 40 फूट अंतरावरील ट्रकमध्ये टाकून तिला विमानतळापर्यंत पोचविण्यात आले. तिच्यावर उपचारासाठी दानशूरांनी केलेल्या मदतीमुळे रुग्णालयाकडे आतापर्यंत 60 लाख रुपये जमा झाले आहेत.

फोटो फीचर