पुरवणी आरोपपत्र दाखल करा - हायकोर्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताचा वडाळा रेल्वे पोलिसांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागावर (सीबीआय) सोमवारी ताशेरे ओढले. एका संशयितावर लैंगिक अत्याचार झाल्याचेही समोर आले होते. या प्रकरणी आरोपींवर योग्य कलमे लावली नसल्याचे निरीक्षण नोंदवत सीबीआयने तपास करून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई - चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताचा वडाळा रेल्वे पोलिसांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागावर (सीबीआय) सोमवारी ताशेरे ओढले. एका संशयितावर लैंगिक अत्याचार झाल्याचेही समोर आले होते. या प्रकरणी आरोपींवर योग्य कलमे लावली नसल्याचे निरीक्षण नोंदवत सीबीआयने तपास करून पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

संशयित अग्नेलो वल्दारीस याचा कोठडीत असताना मृत्यू झाला होता, तर त्याच्या साथीदारावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणास जबाबदार असलेल्या पोलिसांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्य सरकारवरही न्यायालयाने ताशेरे ओढले. संशयितांच्या मृत्यूशी संबंधित नऊ पोलिसांवर गुन्हा दाखल करून सीबीआयने चौकशी करावी. त्या तपासावर महासंचालकांनी देखरेख ठेवावी, असे आदेश यापूर्वी न्यायालयाने दिलेले होते. अग्नेलोचे वडील लिओनार्ड यांनी 2014 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. वडाळा येथील 10 रेल्वे पोलिसांवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला. जानेवारीत आरोपपत्र दाखल केले; मात्र यात अनैसर्गिक संभोगाची कलमे लावली नसल्याची बाब याचिकाकर्त्यांचे वकील युग चौधरी यांनी खंडपीठाच्या निदर्शनाला आणून दिली.
...
दोन महिन्यांची मुदत
आरोपपत्रात नमूद असलेल्या कलमांनुसार किमान तीन वर्षांची शिक्षा आरोपींना होऊ शकते. हत्या आणि अनैसर्गिक संभोग प्रकरणाची कलमे लावली तर आरोपींना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास तातडीने पूर्ण करून या कलमांसह आठ आठवड्यांत पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश खंडपीठाने सीबीआयला दिले.

मुंबई

भाईंदर : मीरा भाईंदर निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी सुरू होताच भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे भाजपा...

01.57 PM

मुंबादेवी : आज रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत दक्षिण मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा "देव माझा उमरखाडीचा राजा" गणरायाची मिरवणूक...

09.54 AM

मुंबई - आमचा नंदीबैल दररोज शेकडो आबालवृद्धांना आशीर्वाद देतो... आज आमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाची आवश्‍यकता आहे......

05.06 AM