कल्याण: महापालिकेच्या आश्वासनानंतर आमदार गणपत गायकवाड यांचे उपोषण मागे

रविंद्र खरात
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

कल्याण पुर्वेतील मुख्य रस्ता चक्कीनाका ते श्रीराम टॉकीज या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम अनेक वर्षापासून संथगतीने सुरू असून ते  पावसाळ्यापूर्वी बंद पडले होते. रखडलेल्या रस्त्यांचे काम सूरु न केल्यास शुक्रवार (ता10) नोव्हेंबर पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिला होता.

कल्याण: महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक कल्याण पूर्वेकडील विकासकामांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या आरोपानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचा इशारा देताच पालिकेने  कल्याण पूर्वमधील पूनालिंक रोडच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे आमदार गायकवाड यांनी उपोषण मागे घेतले आहे.

कल्याण पुर्वेतील मुख्य रस्ता चक्कीनाका ते श्रीराम टॉकीज या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम अनेक वर्षापासून संथगतीने सुरू असून ते  पावसाळ्यापूर्वी बंद पडले होते. रखडलेल्या रस्त्यांचे काम सूरु न केल्यास शुक्रवार (ता10) नोव्हेंबर पासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय समोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिला होता.

आंदोलनाचा इशारा देताच पालिका आयुक्त समवेत अधिकारी वर्गाला आली जाग 
आगामी महीनाभरात हिवाळी विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार असल्याने त्यात हा मुद्दा उपस्थित झाल्यास डोकेदुखी वाढू शकते, यामुळे पालिका आयुक्त पी वेलरासु यांनी आमदार गणपत गायकवाड यांना फोन करून उपोषण न करण्याची विनंती करत दोन ते चार दिवसात पाहणी दौरा करण्याचे आश्वासन दिले, त्यावर न थांबता कामाला ही सुरुवात झाल्याने आमदार गायकवाड यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केल्याची चर्चा पालिका वर्तुळात चांगलीच रंगली आहे .

पालिका आयुक्त पी वेलरासु यांनी फोन करून विनंती करत, तीन-चार दिवसात एकत्र पाहणी दौरा करण्याचे आश्वासन दिले असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने मी उपोषण मागे घेतले अशी माहिती आमदार गणपत गायकवाड यांनी दिली .

परतीच्या पावसामुळे अडचणी होत्या, ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत तेथे डांबरीकरण करण्यात येणार असून अर्धवट आणि रखडलेला सिमेंट रस्ता संबधित ठेकेदार दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करेल अशी माहिती पालिका कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी दिली .