केडीएमटीच्या ताफ्यात लवकरच महिला विशेष तेजस्वनी बस

रविंद्र खरात 
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपुर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून केवळ महिलांसाठी 300 तेजस्विनी बसेस शासनातर्फे देण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करत त्यासाठी 50 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती.

कल्याण : केडीएमटी मार्फ़त लवकरच महिला विशेष तेजस्विनी बस सुरु होणार आहे, या बसेस खरेदी करण्यासाठी येणाऱ्या खर्चास वित्तीय आणि प्रशासकीय मंजूरी परिवहन समितीने दिली असून तो प्रस्ताव आता सोमवार(ता 20 नोव्हेंबर) च्या महासभेत मंजूरी साठी ठेवण्यात येणार असून  हा प्रस्ताव मंजुर होताच केडीएमटीच्या ताफ्यात महिला विशेष बसेस दाखल होणार आहे .

राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपुर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून केवळ महिलांसाठी 300 तेजस्विनी बसेस शासनातर्फे देण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणा करत त्यासाठी 50 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्या निधी मधून कल्याण-डोंबिवली मनपा परिवहन उपक्रमाला 1 कोटी 20 लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. बसेस खरेदी करण्याबाबत 6 मे 2017 रोजी परिवहन समितीच्या मंजुरी नंतर तब्बल 6 महीन्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या महासभेत संबधित प्रस्ताव ठेवण्यात आला असून महासभेची मंजुरी होताच महिलासाठी विशेष बस तेजस्वनी केडीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार आहे.

कल्याण-डोंबिवली मनपाला 1 कोटी 20 लाखांचा निधी ...
राज्य शासनाने नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे, नागपुर कल्याण-डोंबिवली या शहरांना महिलांसाठी तेजस्विनी बस योजना कार्यान्वित करण्यास मान्यता दिली आहे. सुमारे 1 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर झाला आहे, त्यात 4 बस खरेदी करण्याबाबत परिवहन समितीच्या मंजुरी नंतर महासभेत हा विषयावर चर्चा होणार असून महासभेच्या मंजुरीनंतर आगामी 3 महिन्यात ताफ्यात या बसेस येण्याचा मार्ग सुकर होणार आहे. कल्याण डोंबिवली मधील केवळ महिलांसाठी सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 9 या कालावधीत या बसेस धावणार असून या मधील प्रतिसाद पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे सोमवार (ता.20 नोव्हेंबर) च्या महासभेत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .