ठाणे :एलपीजी गॅसचा टँकर उलटल्याने घबराट;घोडबंदर रोडवरील वाहतूक ठप्प

gas tanker
gas tanker

ठाणे : ठाण्यातून वसईच्या दिशेने निघालेला एलपीजी गॅस टँकर सोमवारी ( 3 जूलै ) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उलटला. हा टँकर गॅसने पूर्णपणे भरला असल्याने घोडबंदरवरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा घोडबंदरवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ठाणे आणि मिरा भाईंदर महापालिकेचे अग्निशमनचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. काजूपाडा येथे वळण घेताना नियंत्रण सुटल्याने टॅंकर उलटला. टँकरपासून १०० ते २०० फूट अंतरावर इतर वाहनांना थांबण्यात आले असून हा रोड वाहतुकीसाठी वापरू नये असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

शुक्रवारी झालेल्या अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा अनुभव आज सोमवारी दुपारी देखील वाहनचालकांनी घेतला. भारत गॅसचा (एमएच 43 वाय .2530) हा टँकर घोडबंदर रोडवर गायमुखच्या पुढे काजूपाडा येथे उलटला. एका दक्ष नागरिकाने नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेल्या प्रकारची माहिती दिल्यानंतर घटनास्थळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन व ठाणे आणि मिरा भाईंदर आगमिशन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. गॅस पसरू नये म्हणून फोमचा मारा या टँकरवर मारण्यात आला आहे. टँकरचे चालक आणि वाहक दोन्ही फरार असून वाहतूक पोलिसांनी या रोडवरील वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे. तीन तास उलटूनही वाहतूक सुरळीत होण्यासाठी आणखी 5 तास लागणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात आली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com