केवळ आठ दिवसांत गाठले एव्हरेस्ट बेस कॅम्प

Everest Base Camp reached only in eight days
Everest Base Camp reached only in eight days

कल्याण - कल्याणमधील ९ गिर्यारोहकांनी तब्बल ८ दिवसांत जगातील सर्वात उंचीच्या एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्याजवळील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठले आहे. जिद्द, प्रचंड इच्छाशक्ती, चिकाटी असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते, याची प्रचीती यानिमित्ताने गिर्यारोहकांनी दिली आहे. कल्याण पूर्वसह कल्याणच्या आजूबाजूच्या परिसरातील नरेंद्र सूर्यवंशी यांच्यासह प्रकाश भुजबळ, संजय काळुखे, मनोज डुंबरे, दिनेश गुप्ता, अविरत शेट्ये, दिलीप घाडगे, क्रांती कुलकर्णी, सागर राणे अशी या गिर्यारोहकांची नावे असून सोमवारी (ता.२८) सकाळी ते कल्याणमध्ये पोहचले आहेत.  

प्रति वर्षी एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्याशी असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ जाण्यासाठी ८ ते १० हजार गिर्यारोहक जगभरातून जातात. यंदा कल्याण पूर्वसह कल्याणच्या आजूबाजूच्या परिसरातील नऊ गिर्यारोहकांनी मंगळवारी (ता.२२) एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्याशी असलेले एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठले आहे. सर्वोच्च शिखर एव्हरेस्टसमोर नतमस्तक व्हावे, अशी अनेक गिर्यारोहकांची इच्छा असते; मात्र आर्थिक निधीची उभारणी, जिद्द, प्रचंड कष्ट करण्याची तयारी, वेगवेगळ्या हवामानात तग धरणारी शारीरिक तंदुरुस्ती या गोष्टींनाही महत्त्व दिले जाते. या धर्तीवर १५ मे रोजी या टीमने सुरुवात केली. प्रति दिन १० तास चालत ८ दिवसांत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्याशी जाताना प्रत्येक क्षणाला शारीरिक, मानसिकता क्षमतेची जणू परीक्षाच द्यावी लागली, असे गिर्यारोहक नरेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. जे स्वप्न उराशी बाळगले ते पूर्ण करण्यासाठी तन-मन-धनपूर्वक प्रयत्न करावे लागतात. ते पूर्ण केल्यावर आमच्या टीमने तिरंगा फडकवत आनंद साजरा केला. ५ हजार ३६५ मीटर उंच चढून गेल्यावर वेगळाच आनंद मिळतो. जसेजसे उंच जातो, तसेतसे तापमान कमी होते. ऑक्‍सिजन कमी होतो. अशा परिस्तिथीत प्रत्येक क्षणी संघर्ष करावा लागतो, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली. 

असा केला प्रवास...
कल्याणमधील हे नऊ गिर्यारोहक ४० ते ५५ वयोगटातील असून त्यांनी १२ मे २०१८ पासून कल्याणमधून प्रवासाला सुरुवात केली. मुंबईमधून काठमांडूला विमानाने जात पुढे काठमांडू ते लुकला हेलिकॉप्टरने प्रवास केला. त्यानंतर ६० किलोमीटर ते पायी गेले. पुन्हा २३ मे २०१८ ला त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. २७ मे रोजी काठमांडूवरून ते मुंबईकडे निघाले. सोमवारी (ता.२८) सकाळी ते कल्याणमध्ये दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com