परीक्षा केंद्र निवडीसाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

मुंबई - नीट परीक्षा 7 मे रोजी घेतली जाणार आहे. देशभरातील विविध ठिकाणी परीक्षा केंद्रे असताना विद्यार्थ्यांना आपली परीक्षा केंद्रे निवडण्यासाठी मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 31 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्राची निवड करून नीट प्रशासनाला कळवता येईल. नांदेड येथेही नवे परीक्षा केंद्र मंगळवारी जाहीर करण्यात आले. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात 24 नवी परीक्षा केंद्रे आहेत.

महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, अमरावती आणि अहमदनगर येथेही अतिरिक्त परीक्षा केंद्रे आहे. मराठवाड्यात केवळ औरंगाबाद हे एकमेव परीक्षा केंद्र होते. मात्र नांदेड येथेही परीक्षा केंद्र सुरू झाल्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यात नीटसाठी मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, पुणे व नाशिक या सहा ठिकाणीच केंद्रे होती. आता देशभरातील नीट परीक्षा केंद्रांची संख्या 80 वरून 104 झाली आहे.