27 गावे महानगरपालिकेतून वगळून पुन्हा ग्रामपंचायत करा

dombivali.
dombivali.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत 27 गांवे समाविष्ट करतांना सर्वच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी अनेक आश्वासने देत या भागाचा विकास साधायचा असेल तर पालिकेत गेल्यावर जणू आपले गांव स्मार्ट सिटी होणारअशी आशा दाखवली. पालिकेत सत्तेची गणिते जमल्यावर तीन वर्षे उलटली तरी स्मार्ट जाऊद्या परंतु, प्रत्यक्षात साध्या जीवनावश्यक गरजा म्हणजे पाणी, रस्ते आणि आरोग्य यांचीही वानवा जाणवत आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून होणारी कामेही आज होत नाहीत. अशा परिस्थितीमुळे खरोखर महापालिकेत जाऊन आम्ही घोडचूक केली काय असा प्रश्न पडतो म्हणून पुन्हा ग्रामपंचायत कराअशी जोरदार मागणी प्रभाग क्रमांक 110 सोनारपाडा गोळीवलीच्या  शिवसेना नगरसेविका प्रमिला पाटील यांनी केली आहे.त्या पुढे म्हणाल्या , दिवसेंदिवस वाढता पाणी टंचाईचा प्रश्न ,कचरा न उचलल्यामुळे उद्भवणारा आरोग्याचा प्रश्न व प्रभागातील खड्ड्यात गेलेले रस्ते व दिवाबत्ती अशा अत्यावश्यक नागरीसुविधाही पुरेशा मिळत नाहीत यामुळे ग्रामस्थ लोकप्रतिनिधींना खडे बोल सुनावू लागले आहेत. 27 गावांसाठीचा नविन जलवाहिन्या टाकून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी 5 कोटींचा निधी ठराविक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या संगनमताने जेथे बहुमजली अनधिकृत टॉवर बांधण्याचे काम जोरात सुरु आहे अशा प्रभागात वळवून विकासकांचा विकास व पिढ्यान-पिढ्या गावात व चाळीत वास्तव्य करणाऱ्या ग्रामस्थांच्या मात्र घशाला कोरड अशी बिकट परिस्थिती प्रभागात आहे.

डोंबिवली शहराच्या बाजूलाच असणाऱ्या निवासी विभागसह पिसावली, गोळवली, सोनारपाडा, माणगाव, कोळेगाव, सागांव, नांदिवली, भोपर आदी त्या 27 गावांतील परिस्थिती भयानक आहे. स्वच्छता अभियानाचे ढिंडोरे पिटले जात असताना क्षुल्लक कारणाने कचरा गाड्या बंद ठेऊन रत्याच्या दुतर्फा कचरा वाढत आहे. ग्रामिण भागासाठी पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या कचरा गाड्या होत्या त्याचाच वापर आज केला जात आहे. कोणतीही नवीन रचना पालिका प्रशासनाने अद्याप केलेली नाही. 27 गावांसाठी 500 कर्मचारी असून ते इतरही  विभागात काम करतात. महापालिकेत आम्ही आलो पण हाती काहीच लागले नाही ही मोठी खंत आहे. आता पालिकेतून मोकळे केले तरच आमच्या समस्या आम्ही ग्रामपंचायतीद्वारे चांगल्या प्रकारे सोडवू अशी विचारधारा 27 गावात वाढत आहे. काही स्वार्थी नगरसेवक जनतेचा विचार न करता पालिकेत रहाण्याचे सांगत असले तरी असुविधांना कंटाळलेल्या नागारिकांच्या जनरेट्यामुळे पालिकेतून विकासाच्या नावाने भकास झालेली 27 गावे वगळण्यासाठी मोठे आंदोलन लवकरच उभे राहिल यात शंका नाही. त्यामुळे विकासाच्या मुद्यावर दिवास्वप्ने दाखवत ग्रामीण भागात शिवसेना निवडणुकीत उतरली त्या शिवसेनेला पुन्हा होणारी ग्रामपंचायतीची मागणी म्हणजे जबरदस्त घरचा आहेर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com