टॅब बिघडल्याप्रकरणी पालिकेने काय केले?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

मुंबई - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलेले टॅब बिघडल्याने मुंबई महापालिकेने कोणती कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 6) केली. 

मुंबई - महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलेले टॅब बिघडल्याने मुंबई महापालिकेने कोणती कारवाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 6) केली. 

विद्यार्थ्यांना 2015-16 मध्ये 22 हजार, तर गेल्या वर्षी 15 हजार टॅब देण्यात आले होते. त्यापैकी 10 हजारांहून अधिक टॅब नादुरुस्त झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज म्हस्के यांनी केली आहे. अर्जदाराने या आरोपांच्या पुष्टीसाठी काही शाळांचे तपशील द्यावेत, असे निर्देश मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिले. टॅब पुरवणाऱ्या कंपनीला पालिकेने तीन वर्षांसाठी 50 कोटींचे कंत्राट दिले आहे. पालिका आयुक्तांनी याबाबत काय कारवाई केली, अशी विचारणाही न्यायालयाने केली. अशा प्रकारे पुरवठा केला असेल, तर कंपनीवर कारवाई व्हायला हवी, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचिकेवर दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल.

मुंबई

भाईंदर : मीरा भाईंदर निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी सुरू होताच भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे भाजपा...

01.57 PM

मुंबादेवी : आज रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत दक्षिण मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा "देव माझा उमरखाडीचा राजा" गणरायाची मिरवणूक...

09.54 AM

मुंबई - आमचा नंदीबैल दररोज शेकडो आबालवृद्धांना आशीर्वाद देतो... आज आमच्या कुटुंबाला त्याच्या आशीर्वादाची आवश्‍यकता आहे......

05.06 AM